ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

ओवळे गावातील श्री. म्हसोबा देवस्थान मंदिराचे बांधकाम होणार नाही

पिंपरी : ओवळे गावातील जागृत श्री. म्हसोबा देवस्थान येथे मंदिर बांधकाम करण्याचे कार्य ओवळे गावचे युवा नेते-शिवभक्त अजित शिंदे व मित्र परिवाराच्या वतीने हाती घेतले होते. येत्या काही दिवसांत मंदिराचे बांधकाम सुरू होणार होते. परंतु काही कारणास्तव हे मंदिर बांधकाम करण्यात येणार नाही.

श्री. म्हसोबा देवस्थान मंदिर बांधकामासाठी मावळ तालुक्यातील अनेक सामाजिक, राजकीय अशा विविध क्षेत्रातील दानशूर व्यक्तींकडून देणगी गोळा करण्यात आली होती. मंदिर बांधकाम करण्यासाठी गावातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत भुमिपुजन देखील करण्यात आले होते. येत्या काही दिवसांत मंदिराचे बांधकाम सुरू होणार होते. परंतु काही कारणास्तव हे मंदिर बांधकाम करण्यात येणार नसल्याची माहीती अजित शिंदे यांनी दिली आहे.

हेही वाचा – राज्यात कुठे उष्णतेची लाट, तर कुठे पाऊस! हवामान खात्याने दिला इशारा

तसेच मंदिर बांधकाम साठी गोळा केलेली एकुण ५६ हजार ७४४ रूपये व ५०० वीट अशी सर्व देणगी देणगीदारांना परत देण्यात आली आहे, अशी माहिती अजित शिंदे यांनी दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button