breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

छगन भुजबळ भाजपाच्या वाटेवर? अंजली दमानियांचा मोठा दावा

मुंबई | मराठा आरक्षण आंदोलनासमोर ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी मंत्री छगन भुजबळ यांनी शड्डू ठोकला आहे. या पार्श्वभूमीवर, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी छगन भुजबळ यांच्याबाबत मोठा दावा केला आहे. छगन भुजबळ हे भाजपाच्या वाटेवर असल्याचं अंजली दमानिया यांनी काही दिवसांपुर्वी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. या ट्वीटवर त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

अंजली दमानिया म्हणाल्या की, काही दिवसांपूर्वी मला कुणीतरी सांगितलं होतं की भुजबळांना भाजपा ओबीसी चेहरा बनवणार आहेत. फक्त राज्यातच नाही, तर देशभरात त्यांना तसं प्रमोट केलं जाणार आहे. मागे मंडल आयोगाच्या लढ्याच्या वेळी भुजबळांनी दिलेलं योगदान बरंच मोठं होतं. त्यामुळे भुजबळांना तसं करायचं भाजपाचं ठरलंय. त्यामुळे मला जेव्हा हे पुन्हा कळलं, तेव्हा फार विचित्र वाटलं.

मनोज जरांगे पाटील हे एक साधे शेतकरी होते. ते जर एवढा मोठा लढा देऊ शकतात, तर भुजबळांसारख्या चेहऱ्याची भाजपाला गरज का पडावी? म्हणून मी काल ते ट्वीट केलं. ते भाजपाच्या वाटेवर नक्कीच आहेत. पण एखादा साधा व्यक्ती, साधा एखादा ओबीसीही लढा देऊ शकला असता. पण तसं न करता अशा भ्रष्ट माणसाला भाजपा पुन्हा मोठं करतेय. ज्यांच्याविरुद्ध भाजपानं एकेकाळी पीआयएल केलं होतं. मी आम आदमी पार्टीत असताना जसे भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, तसेच किरीट सोमय्यांनीही केले होते. ते आता गेलं कुठे? कुठेतरी हे राजकारण पाहून फार वेदना होत आहेत, असं अंजली दमानिया म्हणाल्या.

हेही वाचा    –    ‘२०४७ पर्यंत विकसित भारताचा आराखडा दर्शवणार अर्थसंकल्प’; अमित शाह

अजित पवार व त्यांच्याबरोबर पूर्ण फौज भाजपानं सोबत घेतली. या सगळ्या रथी-महारथींना भाजपानं सोबत घेतलंय. त्यात आता भुजबळांना थेट पक्षातच घेतलं जाणार असल्याचं कळल्यावर मला फार विचित्र वाटलं. शिखर बँक घोटाळ्याच्या प्रकरणात त्यांनी अजित पवारांना क्लीनचिट दिली आणि रोहित पवारांची काल ९ तास चौकशी केली. तुम्ही भ्रष्टाचारावर केली जाणारी कारवाई सगळ्यांवर समान घेतली गेली पाहिजे. जे चाललंय ते अतिशय भयानक चाललंय, असंही अंजली दमानिया म्हणाल्या.

अंजली दमानियांचं ट्वीट काय?

भुजबळ भाजपाच्या वाटेवर? एकेकाळी भुजबळांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध जनहित याचिका करणारा भाजपा त्यांना मोठा ओबीसी नेता बनवणार? अशा भ्रष्ट माणसांना मोठं करणार, राजकारणासाठी? कुठे फेडाल हे पाप? असं अंजली दमानिया म्हणाल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button