TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

…अन् विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील हसू परतले!

पिंपरी: पिंपरीतील सायन्स पार्कमध्ये एका तरूणाने दाखवलेल्या मानवतावादी वृत्तीने सायन्स पार्कमधील कर्मचार्‍यांसह भेट द्यायला आलेले नागरिकही भारावून गेले. कारण प्रसंगही तसाच घडला होता.

रविवारी (दि. ५) सकाळी अति दुर्गम भागातील शाळेची सहल सायन्स पार्कला भेट देण्यासाठी आली. तिकिट काढून सर्वांनी थ्रीडी शोचा आनंद घेतला. त्यानंतर, विद्यार्थ्यांना तारामंडल शो पाहण्याची उत्सकुता लागली. मात्र, पुरेसे पैसे नसल्याने शिक्षकांनी शो पाहण्याचा निर्णय स्थगित केला. त्यामुळे विद्यार्थी हिरमुसले. विद्यार्थ्यांचे पडलेले चेहरे एका तरूणाच्या निदर्शनास आले. काहीही विचार न करता त्याने ४० विद्यार्थ्यांसाठी १ हजार ३२० रूपये खर्च करून शोचे तिकीट काढले. अन् काही वेळापूर्वी हिरमुसलेल्या चेहर्‍यांवर आनंद ओसंडला आणि विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला.

या सहृदयी तरूणाचे नाव आहे अमोल मोरे. सायन्स पार्कचे संचालक प्रवीण तुपे यांनी या अनोख्या घडलेल्या प्रसंगाबाबत माहिती दिली. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील अति दुर्गम भागातील शाळेची एक बस सायन्स पार्क भेटीसाठी रविवारी (दि. ५) सकाळी आली होती. शिक्षकांनी प्रवेश व थ्रीडी शोचे सवलतीच्या दराचे तिकीट घेतले. तो शो सुद्धा पाहिला. थ्रीडी शो पाहिल्याने आनंदलेल्या विद्यार्थ्यांना आता तारामंडल शो पाहण्याची ओढ लागली होती. तथापि, तारामंडल शो साठी पुरेसे पैसे नसल्याने शिक्षकांनी हा शो पाहण्याचा निर्णय स्थगित केला. त्यामुळे सर्वच विद्यार्थी हिरमुसले.

याचवेळी प्रवेशद्वाराजवळ उपस्थित असलेल्या अमोल मोरे यांना ही बाब लक्षात आली. कोणतीही ओळख व सबंध नसताना मोरे यांनी कोणताही विचार न करता सर्व ४० विद्यार्थ्यांसाठी तारामंडल शो चे १ हजार ३२० रूपयांचे तिकीट स्वत: काढले. मोरे यांनी तिकीट काढून देताच काही वेळापूर्वी हिरमुसलेल्या विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यांवर आनंद फुलला आणि विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. मोरे यांचे हे मानवतावादी कृती पाहून सायन्स पार्कमधील कर्मचार्‍यांसह उपस्थित नागरिकही भारावून गेले. सायन्स पार्कच्यावतीने प्रवीण तुपे यांच्या हस्ते अमोल मोरे यांचा सत्कार करण्यात आला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button