breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्रमुंबईराजकारण

मनसेचा रणदीप हुड्डाला इशारा; म्हणाले, सावरकरांवर हक्क गाजवण्याचा..

मुंबई : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा जीवनपट सध्या चर्चेत आहे. या चित्रटात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची भूमिका रणदीप हुड्डा साकारणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून रणदीप हुड्डा दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करणार आहे. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी थेट दिग्दर्शक रणदीप हुड्डा यांला इशारा दिला आहे.

अमेय खोपकर यांनी दिग्दर्शक रणदीप हुड्डा यांला पत्र लिहलं आहे. या पत्रात म्हटलं आहे की, हिंदूहृदयसम्राट स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जीवनपट हिंदी भाषेतून जगभरात प्रदर्शित होणं ही तमाम सावरकरप्रेमींसाठी अभिमानाची गोष्ट आहे. लंडनमध्ये म्हणजेच थेट इंग्रजांच्या भूमीत इंग्रजांना आव्हान देऊन स्वातंत्र्यवीरांनी समस्त जगाला अचंबित केलं होतं. अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये त्यांना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. तरीही शेवटपर्यंत ते ब्रिटीशांपुढे झुकले नाहीत. भारतमातेला ब्रिटीशांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी ज्यांनी आपलं आयुष्य समर्पित केलं, अशा स्वातंत्र्यवीरांची धगधगती गाथा मोठ्या पडद्यावर पाहण्याची मोठी उत्सुकता आहे.

हेही वाचा – शक्तिकांत दास यांची मोठी घोषणा, कर्ज आणि EMI चा बोजा वाढणार नाही

प्रदर्शनापूर्वी मात्र आता स्वामित्वहक्कांवरुन वाद सुरू झाला आहे, जो अतिशय दुर्दैवी आहे. हा वाद ताबडतोब थांबायला हवा, कारण यामुळे चित्रपट प्रदर्शनाला विलंब झाला तर तो खुद्द स्वातंत्र्यवीरांचा अपमान असेल. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर हक्क गाजवण्याचा प्रयत्न कुणीही करु नये. हा वाद त्वरित मिटवण्यात यावा आणि स्वातंत्र्यवीरांचं कार्य घराघरात पोचावं ही आमची भूमिका आहे. आम्ही दिलेल्या इशाऱ्याचा आपण योग्य आदर राखाल अशी आमची अपेक्षा आहे, असा इशारा अमेय खोपकर यांनी दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button