breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

चीनमध्ये करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट

बीजिंग | महाईन्यूज

करोनाग्रस्त चीनमध्ये लागोपाठ पंधराव्या दिवशी बरे झालेले रुग्ण व घरी सोडण्यात आलेले रुग्ण यांची संख्या ही नवीन निश्चित रुग्णांपेक्षा अधिक झाली आहे. १९ फेब्रुवारीनंतर हा बदल दिसून आल्याचे हुबेई प्रांतातील रोगनियंत्रण व प्रतिबंध केंद्राचे प्रमुख ली यांग यांनी सांगितले आहे. हुबेई प्रांताची लोकसंख्या ५ कोटी असून हा सगळा भाग चीन सरकारने २३ जानेवारीपासून बंद ठेवला होता. आता मंगळवारपासून हुबेईतील २२ शहरे कमी जोखमीची, १७ मध्यम जोखमीची तर ३७ उच्च जोखमीची आहेत असे सांगण्यात आले.

चीनमध्ये करोना विषाणूने घेतलेल्या बळींची संख्या आता ३०४२ झाली आहे. गुरुवारी तीस जण मरण पावले असून निश्चित रुग्णांची संख्या ही ८०५५२ झाली आहे. करोना विषाणूच्या बळींची संख्या कमी होत असून रुग्णांचा आकडाही दैनंदिन पातळीवर कमी होत चालला आहे. चीनी राष्ट्रीय आरोग्य आयोगाच्या अहवालानुसार, गुरुवारी नवीन १४३ रुग्ण सापडले असून, तीस जणांचा मृत्यू झाला. हुबेई प्रांतात त्यातील २९ जण मरण पावले असून एकाचा हैनान प्रांतात मृत्यू झाला. दरम्यान नवीन संशयितांची संख्या १०२ असून ती एकूण ४८२ झाली. एकूण निश्चित रुग्णांची संख्या ही ८०५५२ आहे. एकूण मृतांची संख्या ३०४२ झाली असून २३७८४ लोकांवर अजून उपचार सुरू आहेत. ५३७२६ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button