breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

१४ दिवसांपासून बेपत्ता झालेल्या कोरोना रुग्णाचा मृतदेह शौचालयात आढळला

मुंबई – एकीकडे कोरोनाचा कहर महाराष्ट्रातून कमी होताना दिसत असताना दुसरीकडे रुग्णालयाचा ढिसाळ कारभार समोर आला आहे. गेल्या १४ दिवसांपासून बेपत्ता असलेला कोरोना रुग्णाचा मृतदेह चक्क रुग्णालयाच्या शौचालयात सापडला आहे. मुंबईतील शिवडी येथील टीबी रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार घडला. रुग्णालयातील शौचालय नियमित स्वच्छ करण्याचे आदेश असतानाही १४ दिवस तेथे कोणीच कसे फिरकले नाही असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. महापालिकेने याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले असून वॉर्डमध्ये काम करणाऱ्या जवळपास ४० कर्मचाऱ्यांना नोटीस बजावली आहे.

हा मृतदेह पूर्णपणे सडलेल्या अवस्थेत होता. त्यामुळे रुग्णाची ओळख पटवणं कठीण झालं होतं. हा मृतदेह पुरुषाचा की स्त्रीचा आहे हे तपासण्यासाठी रेकॉर्ड तपासण्यात आले. यावेळी २७ वर्षीय सूर्यभान यादव नावाचा रुग्ण ४ ऑक्टोबरपासून वॉर्डमधून बेपत्ता असल्याचं लक्षात आलं. “आम्ही बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. पण टीबी रुग्णांनी रुग्णालयातून पळून जाणं येथे नवीन नाही,” असं अधिक्षक डॉक्टर ललितकुमार यांनी सांगितलं आहे.

कोरोना पॉझिटीव्ह असलेले सूर्यभान यादव ३० सप्टेंबरला रुग्णालयात दाखल झाले होते. गोरेगावमधील डॉक्टराने त्यांना तिथे पाठवलं होतं. सूर्यभान यांनी दाखल होताना आपला पत्ता व्यवस्थिपणे दिला नव्हता असं डॉक्टराने सांगितलं आहे. रुग्णालयात एकूण ११ कोरोना रुग्ण असून सूर्यभान यांनी पहिल्या मजल्यावर पुरुषांसाठी असणाऱ्या वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं होतं. ४ ऑक्टोबरला शौचालयासाठी गेल्यानंतर श्वसनाचा त्रास झाल्याने ते तिथेच कोसळले असावेत अशी शक्यता व्यक्त होत आहे.

एकाही कर्मचाऱ्याला स्वच्छता करताना मृतदेहाची माहिती कशी मिळाली नाही यासंबंधी विचारलं असता डॉक्टर ललितकुमार यांनी सांगितलं की, “दिवसातून तीन वेळा शौचालयं स्वच्छ केली जातात. अनेकदा शौचालयांमध्ये रुग्ण असल्याने कर्मचारी त्याची स्वच्छता न करता निघून जातात. पण रुग्ण रोज वापर करतात, त्यामुळे त्यांना दुर्गंध यायला हवा होता. आम्ही सर्व कर्मचाऱ्यांना नोटीस बजावली आहे”.

रुग्णालयातील एका डॉक्टरने कोविड वॉर्ड असल्याने तिथे इतर कोणी कर्मचारी जात नाहीत अशी माहिती दिली आहे. बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर कोविड वॉर्ड असल्याने आम्हीदेखील प्रभागात प्रवेश करणे किंवा शौचालयांची तपासणी करणे टाळले असं पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं आहे. दरम्यान केईएम रुग्णालयाचे फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉक्टर हरिश पाठक यांनी नैसर्गिक कारणामुळे सूर्यभान यांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. पोलीस सध्या याप्रकरणी तपास करत असून यामागे इतर काही कारणं आहेत का याचा शोध घेतला जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button