breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

आयपीएलमधील नव्या अहमदाबाद संघाचा कर्णधार बनला अष्टपैलू हार्दीक पांड्या

 

नवी दिल्ली | टीम ऑनलाइन
लखनऊ आणि अहमदाबाद या आयपीएलच्या १५ व्या हंगामातील दोन नवीन संघानी आपल्या रिटेन खेळाडूंची यादी जाहीर केली आहे.अहमदाबाद संघाचा कर्णधार होण्याचा मान भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दीक पंड्या याला मिळाला आहे .त्यासाठी त्याला या संघाने १५ कोटी रुपये मोजण्याची तयारी दर्शवली आहे.तर लखनऊ संघाने राहुल, स्टॉयनिस आणि बिश्नोई यांना करारबद्ध केले आहे. तर अहमदाबाद संघाने अष्टपैलू हार्दिक पंड्यासह फिरकीपटू राशिद खान आणि शुभमन गिल या तीन खेळाडूंना करारबद्ध केले आहे.

हार्दिक पांड्याकडे अहमदाबाद संघाचे पहिलेच कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. हार्दिक पांड्या आणि राशिद खान यांना अहमदाबाद संघाने प्रत्येकी १५ – १५ कोटी रुपये दिले आहेत. तर शुबमन गिल याला आठ कोटी रुपयात करारबद्ध केले आहे. तीन खेळाडूंसाठी अहमदाबाद संघाने ३८ कोटी रुपये मोजले आहेत. त्यामुळे या संघाकडे आता ५२ कोटी रुपये शिल्लक आहेत.१२ आणि १३ फेब्रुवारी रोजी आयपीएलचा लिलाव पार पडणार आहे. इतर संघांनी निवडलेले खेळाडू आणि त्यांची किंमत रक्कम पुढीलप्रमाणे- मुंबई इंडियन्स- रोहित शर्मा- १६ कोटी, जसप्रीत बुमराह १२ कोटी), सुर्यकुमार यादव- ८कोटी, कायरन पोलार्ड -६ कोटी,चेन्नई सुपरकिंग्ज-महेंद्र सिंह धोनी,१२ कोटी, रविंद्र जाडेजा-१६ कोटी, मोईन अली-८ कोटी आणि ऋतुराज गायकवाड- ६ कोटी,रॉयल चॅलेजर्स बंगळरू- विराट कोहली-१५ कोटी, ग्लेन मॅक्सवेल-११ कोटी, आणि मोहम्मद सिराज- ७ कोटी,दिल्ली कॅपिटल्स- रिषभ पंत-१६ कोटी, अक्षर पटेल-९ कोटी, पृथ्वी शॉ-७.५० कोटी, अनरिच नॉर्टीजे- ६.५० कोटी,सनराईजर्स हैदराबाद- केन विल्यमसन १४ कोटी,अब्दुल समद- ४ कोटी, उमरान मलिक -४ कोटी,कोलकाता नाईट रायडर्स- आंद्रे रसल- १२ कोटी, वरुण चक्रवर्ती- ८ कोटी,व्यंकटेश अय्यर- ८ कोटी,सुनील नारायण ६ कोटी,पंजाब किंग्ज- मयांक अग्रवाल-१२ कोटी,अशदीप सिंह- ४ कोटी,राजस्थान रॉयल्स- संजू सॅमसन- १४ कोटी, जॉस बटलर- १० कोटी,यशस्वी जयस्वाल- ४ कोटी,लखनऊ – केएल. राहुल- १७ कोटी, मार्कस स्टॉयनिस -९.२ कोटी,रवि बिश्नोई- ४ कोटी अशी आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button