breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

अक्षयचा सूर्यवंशी चित्रपटगृहांमध्ये ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार

मुंबई – कतरिना कैफ आणि अक्षय कुमारच्या बहुचर्चित ‘सूर्यवंशी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख समोर आली आहे. अक्षयने ‘सूर्यवंशी’ चित्रपटाचा एक टीझर ट्वीटर अकाऊंटवरून शेअर करत म्हटलंय, ‘आम्ही वचन दिल्याप्रमाणे तुम्हाला चित्रपटगृहांमध्ये भेटणार आहोत…आता ती वेळ आली आहे. आ रही है पुलिस! सूर्यवंशी हा चित्रपट जगभरात ३० एप्रिल २०२१ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.’

वाचा :-‘त्या’ बोल्डसीनमुळे सायली संजीव चर्चेत

अक्षय कुमारने शेअर केलेल्या टीझरमध्ये सुरुवातीला सूर्यवंशी चित्रपटाचा ट्रेलर २ मार्च २०२०मध्ये लाँच करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. परंतु आम्ही प्रेक्षकांना वचन दिले होते की योग्य वेळ येताच सूर्यवंशी हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार. जवळपास एक वर्ष उलटले आहे. आता सूर्यवंशी हा चित्रपट जगभरात चित्रपटगृहांमध्ये ३० एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.

दरम्यान, रोहित शेट्टी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून यात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत झळकणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त अभिनेता रणवीर सिंग, अजय देवगण, कतरिना कैफ आणि जॅकी श्रॉफ हेदेखील महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button