breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

‘महायुतीत सहभागी होण्याचा अजितदादांचा निर्णय राज्याच्या हिताचा’; खासदार बारणे

कामोठे : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी महायुतीत सहभागी होण्याचा घेतलेला निर्णय हा दूरदृष्टीचा व महाराष्ट्राच्या दीर्घकालीन हिताचा आहे, असे मत मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केले.

राज्याचे मुख्यमंत्री लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कामोठे येथे कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यात ते बोलत होते. त्यांच्या समवेत शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे होते.

हेही वाचा – ‘योगींनी युपीतच थांबावं, तिथे भाजपाची..’; संजय राऊतांचा हल्लाबोल

संवाद मेळाव्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष महेश जाधव, प्रदेश सचिव शिवदास कांबळे, सरचिटणीस भीमसेन माळी, पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष महादेव पाटील, कार्याध्यक्ष राजकुमार पाटील, संघटक अमोल बोचरे, उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, स्वप्नील काळे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष प्रज्ञाताई चव्हाण तसेच दर्शन ठाकूर, रमेश फडके, प्रसाद पिंगळे, कविताताई पोपेटा, नंदू भोपी, शिवाजी पाटील, मंगेश नेरुळकर, हबीब फैजल शेख, कासम मुलानी, जयसिंग पाटील, अक्षय सुतार, अक्षय देवकर, शहाजी रुपनर, बिरुदेव सरगर, बिरा वाघमारे, संदीप जाधव, दादासाहेब मोहिते, संतोष तरंगे, शिवाजी पराथाडे, संतोष बिचकुले, विठ्ठल मारगुडे, निलेश पाटील, सचिन आम्रे, प्रथमेश भणगे आदी पदाधिकारी व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बारणे म्हणाले की, अजित पवार, सुनील तटकरे, आदिती तटकरे हे अभ्यासू व मेहनती नेते आहेत. सर्वांनी मिळून महाराष्ट्राच्या विकासाला गती देण्यासाठी महायुतीमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. देशात व राज्यात एकाच विचाराचे सरकार असल्यास सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देणे सोपे होते. त्यामुळे सर्वांनी मिळून नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला आहे.

‘श्रीरंग आप्पा तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘अब की बार, चार सौ पार’, ‘फिर एक बार, मोदी सरकार’, ‘अजितदादा जिंदाबाद’च्या घोषणा यावेळी देण्यात आल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button