breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

‘गुम है किसी के प्यार में’ या मालिकेतून बॉलिवूडची ‘उमराव जान’ लवकरच प्रेक्षांच्या मनावर गाजवणार राज्य

“सलाम-ए-इश्क़ मेरी जाँ ज़रा क़ुबूल कर लो
तुम हमसे प्यार करने की ज़रा सी भूल कर लो
मेरा दिल बेचैन, मेरा दिल बेचैन है हमसफ़र के लिये”,

या गाण्यामधून आपल्या दिलखेचक अदांनी अवघ्या सिनेसृष्टीला वेडं लावणारी ज्येष्ठ अभिनेत्री रेखा आता छोट्या पडद्यावरही आपली अदा दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे.

अभिनेत्री रेखा आता स्टार प्लसवरील ‘गुम है किसी के प्यार में’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रेखा यांच्या चाहत्यांसाठी ही पर्वणीच म्हणावी लागणार आहे. त्यांची एक झलक पाहण्यासाठी आसुसलेल्या त्यांच्या चाहत्यांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे. या मालिकेचा एक प्रोमो सध्या व्हायरल होत आहे.

या प्रोमो मध्ये रेखा स्वत: ‘गुम है किसी के प्यार’ हे गाणे गाताना दिसत आहे. यात त्यांनी ‘हे गाणे माझ्या हृदयाच्या अगदी जवळ असून यात काही तरी एक गोष्ट दडलेली आहे. ज्यात प्रेमाची वाट पाहू शकतो मात्र त्याचे नाव घेण्याचा परवानगी नाही’ असे रेखा सांगत आहे.

या प्रोमोमधील रेखा यांच्या मादक नजरा, दिलखेचक अदा चाहत्यांना अक्षरश: घायाळ करणा-या आहेत. वयाची 65 वर्ष पूर्ण करुनही त्यांच्या सौंदर्यात तसूभरही कमी झाली नाही उलट ते आणखीनच खुलून आलेले या प्रोमो मध्ये दिसत आहे. मात्र या मालिकेत रेखा स्वत: काही भूमिका करणार की काही दिवस पाहुणा कलाकार म्हणून काम करणार हे येणा-या काही दिवसात कळेल. ‘गुम है किसी के प्यार में’ ही मालिका 5 ऑक्टोबरपासून स्टार प्रवाह रोज रात्री 8 वाजता पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या प्रोमोमागचे रहस्य हे त्याच दिवशी सर्वांना कळेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button