breaking-newsTOP Newsराजकारणसातारा

उदयनराजेंना अजित पवारांची ‘घड्याळा’ची ऑफर, पण राजे कमळावरच ठाम

सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी उदयनराजे भोसले इच्छुक आहे. मात्र, भाजपकडून आतापर्यंत जाहीर करण्यात आलेल्या यादीत त्यांचे नाव नसल्याने त्यांनी थेट दिल्ली गाठली आहे. मागील तीन दिवसांपासून दिल्लीत ठाण मांडून असलेल्या उदयनराजे भोसले यांनी काल रात्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यामुळे आता अमित शाह यावर काही तोडगा काढणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. मात्र, अजित पवार गट साताऱ्याची जागा सोडण्यासाठी तयार नाही.

महायुतीत सातारा लोकसभा मतदारसंघाची  जागा भाजप आणि राष्ट्रवादीसाठी डोकेदुखी ठरत आहेत. महायुतीकडून साताऱ्यात उदयनराजे भोसले  यांना उमेदवारी देण्यावर एकमत झाले आहे. मात्र, महायुतीत ही जागा राष्ट्रवादीकडेच राहणार असल्याच्या भुमिकेवर अजित पवार ठाम आहे. त्यामुळे उदयनराजेंनी राष्ट्रवादी पक्षाच्या घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवावी अशा प्रस्ताव अजित पवारांनी दिला आहे. मात्र, उदयनराजे हे भाजपच्या कमळावरच निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे महायुतीत सातारा लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटता सुटत नसल्याचे चित्र आहे.

हेही वाचा – मावळमध्ये महायुतीतील तिढा वाढला

सातारा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जातो. त्यामुळे महायुतीत देखील या जागेवर राष्ट्रवादीकडून दावा केला गेला आहे. अशात उदयनराजे भोसले भाजपकडून या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. पण, अजित पवारांकडून या मतदारसंघावर दावा करण्यात आल्याने भाजपची कोंडी झाली आहे. अशात उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव अजित पवारांकडून देण्यात आला आहे. पण, कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादी हा मतदारसंघ सोडणार नसल्याची भूमिका अजित पवार गटाची आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार निश्चित झाला आहे, पण कोणत्या पक्षाकडून लढणार यावर निर्णय होत नसल्याचे चित्र आहे. उदयनराजे भोसले जर येथून निवडणूक लढवणार असतील, तर त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवली पाहिजे अशी भूमिका अजित पवार गटाची आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत सातारा लोकसभा मतदारसंघाची जागा ही भाजपनेच लढवावी यावर उदयनराजेही ठाम आहेत. यासाठी उदयनराजे तीन दिवसांपासून दिल्लीत आहे. त्यामुळे आता उदयनराजे कमळावर की राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. त्यानंतरचा सातारा लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button