breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

धक्कादायक! जोडप्याचं दिल्लीतून अपहरण, मध्यप्रदेशात हत्या आणि वेगवेगळ्या राज्यात फेकलं

उत्तर प्रदेश |

उत्तर प्रदेशातील एका जोडप्याची निर्घुणपणे हत्या केल्याची घटना उघड झाली आहे. शेजारी राहणाऱ्या दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं.मात्र कुटुंबीयांच्या त्यांच्या प्रेमाला विरोध होता. त्यांनी कुटुंबीयांना समजवण्याचा प्रयत्न देखील केला. मात्र त्यांनी त्यांना स्पष्ट नकार दिला. त्यामुळे दोघांना घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतला. मुलगी अल्पवयीन होती. मात्र त्यानंतर घडलेला प्रकार एकदम धक्कादायक आहे. या जोडप्याचं दिल्लीतून अपहरण झाल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर मध्य प्रदेशात हत्या करण्यात आली. तसेच मुलीचा मृतदेह मध्य प्रदेशात फेकल्यानंतर मुलाचा मृतदेह राजस्थानमध्ये फेकण्यात आला. या घटनेच्या तपासात पोलीस देखील चक्रावून गेले आहेत. मृतदेह मिळाल्याच्या ४२ दिवसानंतर हत्येचा उलगडा झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वात प्रथम हे जोडपं दिल्लीत असल्याचं कुटुंबियांना कळलं. त्यानंतर त्यांची मध्य प्रदेशाताली भिंडमध्ये नेलं. त्यानंतर भिंड येथून ग्वाल्हेरला गेले आणि वाटेतच त्यांची हत्या केली. त्यांची नुसती हत्या करून थांबले नाहीत. चाकूने गुप्तांगावर वार केले. अत्री पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाशीकडे जाणाऱ्या महामार्गावर त्यांची हत्या केल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर राजस्थान पोलिसांना मुलीचा मृतदेह धोलपूर परिसरात आढळून आला. पिवळ्या प्लास्टिक दोरीचा वापर करून मुलीला गळा आवळून मारल्याचं समोर आलं.

५ ऑगस्टला तरुणाचा मृतदेह ग्वालियरमधील आंतरी येथे भरथरी पुलाजवळ आढळून आला. यासाठी पोलिसांनी फॉरेन्सिग एक्सपर्टची मदत घेतली. त्यात युवकाचं गुप्तांग कापल्याचं समोर आलं. मात्र मृतदेहाची ओळख पटू शकली नव्हती. पोलीस या प्रकरणाच तपास करत होती. दरम्यान उत्तर प्रदेशच्या फिरोजाबादमधील सिरसागंज पोलीस ठाण्यातील पोलीस ग्वालियरला आले. त्यानंतर मृतदेह जहांगीरपूरमधील २० वर्षीय उत्तम सिंह यादव याचा असल्याचं निष्पन्न झालं. पोलिसांनी यानंतर मुलीच्या कुटुंबीयांना चौकशीसाठी बोलवलं. संशय आल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. त्यानंतर त्यांनी दोघांची हत्या केल्याचं कबुल केलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button