breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘लावणीच्या नावावर अश्लील नृत्य नको’; अजित पवार यांचं विधान

मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यात होणाऱ्या अश्लील लावणी नृत्य कार्यक्रमांवर जाहीर नारीज व्यक्त केली आहे. यावेळी त्यांनी असे अश्लील नृत्याचे कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आयोजन न करण्याच्या सूचना अजित पवार यांनी केल्या आहेत.

राष्ट्रवादी चित्रपट, साहित्य, कला आणि सांस्कृतिक विभागाची बैठक अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी, हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला कमीपणा आणणारं आहे. महाराष्ट्राची लावणीची एक परंपरा आहे. आपल्या इथं चालणारे लावणी कार्यक्रम सर्वांना पाहता येतील असे झाले पाहिजे. त्यात अश्लील प्रकार व्हायला नको. दुर्दैवाने काही जिल्ह्यांमध्ये अशा कार्यक्रमांना बंदी आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये ते चालू आहे. नक्की वस्तूस्थिती काय आहे याबाबत मी संबंधितांशी बोलणार आहे. तसेच वेळ पडली तर अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा विषय मांडू, असंही अजित पवार म्हणाले.

महाराष्ट्राची एक उच्च परंपरा आहे. पहिल्यापासून आपल्या वडिलधाऱ्यांनी एक परंपरा निर्माण केली आहे. ती परंपरा टिकली पाहिजे. त्यामुळे कोणी चुकीचं वागत असेल, तर त्याला पायबंद घातला पाहिजे, अशी माझी आग्रही भूमिका आहे. तो विषय मी अर्थसंकल्पात मांडेन, असं अजित पवार म्हणाले.

अनेकदा असे कार्यक्रम होत असतात. या कार्यक्रमांच्या पाठीमागे राष्ट्रवादी काँग्रेसचे फलक असतात. हे आम्हाला अजिबात मान्य नाही. अशा पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसनच्या सहकाऱ्यांनी कार्यक्रम करता कामा नये. तशा सूचना राष्ट्रवादी पाक्षांच्या सर्व जिल्ह्यांच्या अध्यक्षांना देणार आहोत, असंही अजित पवार म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button