breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमहिला दिनमुंबईराजकारणराष्ट्रिय

‘राज्याच्या मंत्रिमंडळात एक देखील महिला नाही..’; अजित पवारांनी बोलून दाखवली खंत

पुरोगामित्वाला हरताळ फासणाऱ्या शिंदे-फडणवीस सरकारला महिला दिनाच्या शुभेच्छा

मुंबई : राज्य विधिमंडळ अधिवेशनाच्या अर्थसंकल्पीय सत्राचा आजपासून दुसरा आठवडा सुरू झाला आहे. आज जागतिक महिला दिन आहे. जागतिक महिला दिनाच्या समस्त महिला वर्गाला शुभेच्छा देताना, एवढा मोठा महाराष्ट्र आहे पण या महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात एक देखील महिला नसणे हे कमीपणाचे वाटते, अशी खंत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली. 

महाराष्ट्र सरकारला हे शोभत नाही. अनेकवेळा जाहीर सभांमध्ये, प्रसारमाध्यमांमध्ये तसेच सभागृहातही याविषयी उल्लेख मी केला आहे. पण काय अडचण आहे हे कळायला मार्ग नाही. निश्चितच ही बाब आम्हालाही योग्य वाटत नाही व महिला वर्गालाही योग्य वाटत नाही, असे अजित म्हणाले.

राज्याच्या मंत्रिमंडळात एकाही महिला लोकप्रतिनिधीला प्रतिनिधीत्व न देता, ज्या महाराष्ट्र राज्याने महिला धोरण राबवण्यासाठी सर्वप्रथम देशात पुढाकार घेतला होता, अशा पुरोगामी महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाला हरताळ फासणाऱ्या शिंदे-फडणवीस सरकारला महिला दिनाच्या शुभेच्छा ?, असा टोला राष्ट्रवादीने शिंदे-फडणवीस सरकारला लगावला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button