breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराजकारण

AIMIM नेते अकरबरुद्दीन ओवेसी यांनी भरसभेत पोलीस अधिकाऱ्याला धमकावलं; म्हणाले..

Telangana Elections 2023 : ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन अर्थात AIMIM चे नेते अकरबरुद्दीन ओवेसी हैदराबाद येथील ललिताबाग येथे प्रचारसभा घेत होते. यावेळी संतोषनगरच्या एका पोलीस निरिक्षकाने नेत्यांना सभा वेळेत आटोपण्याची सूचना केली. यामुळे AIMIM चे नेते प्रचंड संतापले. पोलिसांनी सभा बंद करण्याची सूचना केल्याने त्यांनी पोलिस अधिकाऱ्याला धमकावलं.

अकरबरुद्दीन ओवेसी म्हणाले, चाकू आणि गोळ्यांचा सामना केल्यामुळे मी कमजोर झालोय असं वाटतंय का तुम्हाला? माझ्यात अजूनही हिंमत आहे. पाच मिनिटे अजून उरली आहेत, मी आणखी पाच मिनिटे बोलणार. कोणी मायका लाल जन्माला आलेला नाही, जो मला थांबवू शकेल.

हेही वाचा  –  ICC ने केला क्रिकेटच्या नियमांत बदल! गोलंदाजाच्या चुकीमुळे संघाला बसणार पाच धावांचा दंड

यानंतर त्यांनी लोकांना संबोधून विचारलं की, मी बरोबर बोललो ना? जर मी इशारा दिला तर तुम्हाला इथून जावं लागेल की आम्ही तुम्हाला पळवू? आम्हाला कमजोर करण्यासाठी हे लोक इथे येत असतात, असंही अकरबरुद्दीन ओवेसी म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button