breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

MPL २०२३ : ‘या’ संघाने पटकावले MPL २०२३ चे विजेतेपद

MPL २०२३ : महाराष्ट्र प्रीमियर लीगमधील अंतिम सामना आज पुण्यातील गहुंजे मैदानावर पार पडला. रत्नागिरी जेट्स आणि कोल्हापूर टस्कर्स या संघात हा सामना खेळला गेला. कोल्हापूर संघाने प्रथम फलंदाजी करत ११ ओव्हरमध्ये ८ विकेट गमावत ८० धावा केल्या. यानंतर पावसामुळे सामना थांबवण्यात आला. त्यामुळे रत्नागिरी जेट्स या संघाला एमपीएल २०२३ चा विजेता संघ म्हणून घोषित केलं आहे.

हा सामना काल संध्याकाळी खेळला जाणार होता मात्र पावसामुळे हा सामना आज खेळला गेला. आजही पावसाने हजेरी लावली त्यामुळे सामना रद्द करण्यात आला आणि टेबलवर उच्च स्थान मिळवणारा संघ असणाऱ्या रत्नागिरी जेट्स संघाला ShriramCapitalMPL2023 चा विजेता संघ म्हणून घोषित करण्यात आले.

https://twitter.com/mpltournament

एमपीएलच्या अधिकृत ट्वीटर हॅन्डेलवरून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे यंदाच्या MPL ची ट्रॉफी उंचावण्याचा मान रत्नागिरी जेट्स या संघाला मिळाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button