Uncategorizedताज्या घडामोडीमुंबई

कोकण मंडळांच्या सोडतीबाबत विपरित अनुभव ;३, ५०० विजेत्यांनी नाकारली म्हाडाची घरे; कारण काय?

० ३,५०० विजेत्यांना घरांचा ताबा नको

० कागदपत्रे जमा करण्याकडे दुर्लक्ष

मुंबई : म्हाडा मंडळांच्या सोडतीत घरे मिळावी म्हणून चातकासारखी वाट पाहणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. मात्र, म्हाडाच्या कोकण मंडळातील घरांच्या सोडतीबाबत विपरित अनुभव येत आहेत. म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या गेल्या वर्षी ऑक्टोबरमधील सोडतीत विजेते ठरुनही ३,५०० विजेत्यांनी ही घरे नाकारली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने गेल्या ऑक्टोबरमध्ये ८,९८४ घरांची सोडत जाहीर केली होती. त्यास अर्जदारांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला होता. त्यात म्हाडा योजनेसह पंतप्रधान आवास योजनेतील घरांची संख्या अधिक होती. मात्र अनेक विजेत्यांनी या घरांचा ताबा नको असल्याचे स्पष्टपणे कळविले आहे. त्या योजनेत कोकण मंडळाने म्हाडा योजनेसह पंतप्रधान आवास योजनेतील विजेत्यांना कागदपत्रे सादर करण्यास यापूर्वी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत दिली होती. त्यासह, सोडतीत विजेते ठरुनही बऱ्याच जणांनी कागदपत्रे जमा करण्याकडे दुर्लक्ष केले.

तत्पूर्वी, एसटी आंदोलनाने ग्रामीण भागातील विजेत्यांपर्यंत प्रथम सूचनापत्र पोहोचू शकले नव्हते. तेव्हा, तेव्हाच्या मागणीनुसार मंडळाने पंतप्रधान आवास आणि म्हाडा योजनेतील विजेत्यांना कागदपत्रे सादर करण्यास १५ जानेवारी २०२२ पर्यंत अंतिम मुदतवाढ दिली होती. यानंतरही प्रतिसाद मिळत नसल्याने पुन्हा एकदा ३१ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. या मुदतीमध्येही विजेत्यांनी कागदपत्रे जमा केली नाहीत.

पंतप्रधान आवास योजनेतील ८५० विजेत्यांनी घरे परत केली आहेत. तर म्हाडा योजनेतील विरार बोळींज योजनेतील सुमारे २७० विजेत्यांनी घरे परत केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पंतप्रधान आवास योजनेतील एक हजार ९५१ तर म्हाडा योजनेतील ४३२ विजेत्यांनी कागदपत्रे सादर केली नाहीत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button