breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराजकारण

पेपर फोडल्यास १० वर्षांचा तुरुंगवास आणि १ कोटी रुपयांचा दंड!

मुंबई | पेपर फुटीबद्दल शासनाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पेपर फोडल्यास आता कठोर शिक्षेची तरतूद करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. सरकारने संसदेत विधेयक सादर केलं आहे. या विधेयकानुसार साधा दंड नसून पेपर फुटी करणाऱ्याला तब्बल १ कोटी रूपयांचा दंड हा भरावा लागणार आहे. फक्त दंडच नाही तर पेपर फुटी केल्यावर थेट शिक्षा देखील भोगावी लागणार आहे.

संसदेत सोमवारी ५ फेब्रुवारीला परीक्षा अन्याय प्रतिबंधक विधेयक २०२४ लोकसभेत सादर करण्यात आलं आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी हे विधेयक मांडले आहे. जर एखादा व्यक्ती हा पेपर फुटीमध्ये आढळला तर त्याला तब्बल १० वर्षांचा तुरुंगवास आणि १ कोटी रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. तसेच, दुसऱ्याच्या जागी डमी परीक्षार्थी बनून दिल्यास ३ ते ५ पर्षांच्या शिक्षा आणि १० लाख रूपयांचा दंड भरावा लागणार आहे.

हेही वाचा     –    अट्टल गुन्हेगार असिफ दाढी आणि अजित पवार यांच्यात भेट, कारण काय?

केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतीच या विधेयकाला मंजुरी दिली होती. परीक्षा अन्याय प्रतिबंधक विधेयक २०२४ या प्रस्तावित विधेयकात गुन्हेगारीला लक्ष्य करून त्यावर कारवाईची तरतूद करण्यात आली आहे. विधेयकात उच्चस्तरीय तांत्रिक समितीचाही प्रस्ताव आहे. ही समिती संगणाद्वारे होणारी परीक्षा प्रक्रिया अधिक सुरक्षित करण्यासाठी शिफारशी करणार आहे. हा केंद्रीय कायदा असेल आणि त्यात संयुक्त प्रवेश परीक्षा आणि केंद्रीय विद्यापीठांच्या प्रवेशासाठीच्या परीक्षांचाही समावेश असेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button