breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

पुण्यातील कर्वे रस्त्यावर आजपासून चक्राकार वाहतूक

पुणे – कर्वे रस्त्यावरील अभिनव (नळस्टॉप) चौकात नव्याने उभारण्यात येणाऱ्या दुहेरी उड्डाणपुलाच्या कामास सुरुवात करण्यासाठी आजपासून शनिवारी मध्यरात्रीपासून चौकातील वाहतूक वळविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी चक्राकार वाहतूक किंवा आहे. त्या ठिकाणी बॅरिकेडिंग करून रस्ता उपलब्ध करून देण्याच्या पर्यायांचा विचार सुरू आहे. या दोन्ही पर्यायांची दोन ते तीन दिवस प्रायोगिक चाचणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर काम पूर्ण होईपर्यंत वाहतूक वळविण्यात येणार असल्याचे ‘महामेट्रो’ व्यवस्थापनाने स्पष्ट केले.

शनिवारी सकाळी साडेअकरा पासून बॅरिगेट लावून रस्त्यावर चक्राकार वाहतूक योजनेची चाचणी घेण्यास सुरुवात करण्यात आल्यानंतर कर्वे रस्त्यावर पंधरा मिनिटांतच वाहनांच्या रांगा लागण्यास सुरुवात झाली आहे.

अशी असेल चक्राकार वाहतूक
– कर्वे रस्त्याकडून डेक्कनकडे जाणाऱ्या वाहनांनी कर्वे रस्त्यावरून ‘एसएनडीटी’ महाविद्यालायच्या समोरून लॉ कॉलेज रस्त्याने आठवले चौकात जावे.
– तेथून उजवीकडे वळसा घेऊन ही वाहने पुन्हा अभिनव चौकात येऊ शकतील.
– एकेरी वाहतूक करण्यासाठी ‘एसएनडीटी’ महाविद्यालय ते अभिनव चौकापर्यंत डेक्कनकडे जाणारा रस्ता पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. डेक्कनकडून कर्वे रस्त्याने जाणारी वाहतूकही पूर्ववत ठेवण्यात येईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button