आदित्य ठाकरे, अजित पवार यांच्या ‘रोड शो’ला तुफान गर्दी, नाना काटे यांचा विजय निश्चित : मयूर कलाटे
पिंपरी : चिंचवड विधानसभा मतदार संघात परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहेत. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या रोड-शो ला झालेली गर्दी पाहता, महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांचा विजय निश्चित आहे, असा विश्वास राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक मयूर कलाटे यांनी व्यक्त केला.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या प्रचाराच्या पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार तसेच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा भव्य असा रोड – शो आयोजित करण्यात आला होता.
या रोड शो साठी नागरिकांची प्रचंड गर्दी झाल्याचे दिसून आले.वाकड परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मयूर कलाटे यांच्या वतीने वाकड परिसरात रोड शो चे जंगी असे स्वागत करण्यात आले.यावेळी जमलेली गर्दी पाहता वाकड मधून विठ्ठल उर्फ नाना काटे यांना प्रचंड मताधिक्य मिळणार असून महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे हेच चिंचवड पोटनिवडणुकीत विजयी होतील, असा विश्वास मयूर कलाटे यांनी व्यक्त केला.