breaking-newsपिंपरी / चिंचवड

पिंपरीत चाॅकलेट-बिस्कीट गोदामाला आग

पिंपरी ( महा ई न्यूज ) – बिस्किट व चॉकलेटच्या गोदामाला आग लागली. पिंपरीतील भाटनगर येथे शनिवारी (दि. २७) सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. अग्निशामक दलाचे चार ते पाच बंब घटनास्थळी दाखल झाले असून, दुपारी साडेबारापर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते.

याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पिंपरी कॅम्प, भाटनगर येथे तीन मजली इमारतीत तळमजल्याला दुकान असून वरच्या दोन मजल्यांवर बिस्किट व चॉकटलेटचे गोदाम आहे. या गोदामात शनिवारी सकाळी आग लागली. याबाबत माहिती मिळताच अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आग विझविण्यासाठी कसोशिने प्रयत्न केले. आग लागल्याची माहिती मिळताच येथे बघ्यांची गर्दी झाली. आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button