breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

संभाजी ऐवले यांना पदोन्नतीपासून वंचित ठेवणा-या भ्रष्ट अधिका-यांची आता टोलवाटोलवी

  • नगरविकास मंत्र्यांच्या विशेष कार्याधिका-यांनी रखडवून ठेवली फाईल

पिंपरी / महाईन्यूज

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागाचे निवृत्त झालेले समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले यांना पदोन्नतीचा लाभ मिळू न देण्यासाठी अधिका-यांची मोठी खेळी झाली आहे. पिंपरी पालिका प्रशासनातील अधिका-यांच्या सांगण्यानुसार मंत्रालयातील कक्ष अधिकारी आणि नगर विकास मंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी कृष्णा जाधव यांच्यामुळे पदोन्नती रखडल्याची माहिती समोर येत आहे.

महापालिकेतील भ्रष्ट अधिका-यांच्या लॉबीमुळे समाज विकास अधिकारी ऐवले यांच्या पदोन्नतीला अडथळे निर्माण झाले. नागरवस्ती विकास योजना विभागासाठी सहायक आयुक्त (सामुहिक विकास), सहायक आयुक्त (दिव्यांग कक्ष) आणि मुख्य समाज विकास अधिकारी अशा अभिनामाची तीन पदे मंजूर झाली. महासभेच्या ठरावानुसार त्याला मंजुरी देण्यात आली. मात्र, त्याची अंमलबजावणी करताना शैक्षणिक अर्हता धारण करणारे ऐवले यांना सोयीस्करपणे डावलण्यात आले. भ्रष्ट अधिका-यांच्या साखळीमुळे त्यांना डावलून पैसे देणा-या अधिका-यांना सहायक आयुक्त पदावर बसवण्यात आले.

ऐवले यांच्या पदोन्नतीसाठी मंत्रालयातील कक्ष अधिकारी दिलीप वनिरे यांच्या शिफारस पत्राची प्रतिक्षा होती. निवृत्तीच्या शेवटच्या क्षणापर्यंत ऐवले यांनी वनिरे यांच्या पत्राची वाट पाहिली. परंतु, वनिरे यांनी शेवटच्या क्षणी देखील पत्र पाठविले नाही. त्यामुळ ऐवले यांना निवृत्ती झाल्यानंतर नाराज होऊन घरी परतावे लागले. आता पदोन्नतीसाठी मुख्य समाज विकास अधिकारी पदाला मंजुरीच्या शिफारस पत्रावर नगरविकास मंत्री यांची स्वाक्षरी झाल्याची माहिती समजते. मात्र, ती फाईल मंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी कृष्णा जाधव यांनी अडवून ठेवल्याची माहिती समजते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button