TOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपमहाराष्ट्रमुंबई

पिंपरी-चिंचवडमधील तीन टोळ्यांवर ‘मोक्का’अंतर्गत कारवाई

पिंपरी :

चिखली, सांगवी आणि तळेगाव एमआयडीसीतील तीन टोळ्यांवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश दिले.

चिखलीतील टोळी प्रमुख करण रतन रोकडे (वय २५, रा. चिंतामणीनगर, चिखली) आणि त्याचे १२ साथीदार, सांगवीतील टोळी प्रमुख बाबा सैफन शेख, (वय २९, राजीव गांधीनगर, पिंपळे गुरव) त्याच्या टोळीतील इतर पाचजण आणि तळेगाव एमआयडीसीतील टोळी प्रमुख अनिल जगन जाधव (वय २३, रा. वराळे, ता. मावळ) याच्यासह सहाजणांविरोधात मोक्काची कारवाई करण्यात आली आहे.

या टोळीतील आरोपींच्या विरोधात खून, खुनाचा कट रचणे, खुनाचा प्रयत्न, दरोडा, दरोड्याची तयारी करणे, खंडणी मागणे, बेकायदेशीर जमाव जमवून खुनाचा प्रयत्न, दुखापत, विनयभंग, जबरी चोरी असे विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. या तिन्ही टोळ्यांतील आरोपींनी संघटित गुन्हेगारी टोळी बनवून हिंसाचाराच्या वर्चस्वासाठी व आर्थिक फायद्यासाठी वापर केला.

ही कारवाई सहपोलीस आयुक्त, डॉ. संजय शिंदे, अपर आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्‍त स्वप्ना गोरे, काकासाहेब डोळे, सहायक आयुक्‍त बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे, ज्ञानेश्वर काटकर, सुनिल टोणपे, रणजित सावंत, पोलीस हवालदार सचिन चव्हाण, व्यंकप्पा कारभारी, दुर्गा खाडे, सुहास डंगारे, सचिन नांगरे, यांच्या पथकाने केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button