ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

दारुबंदीअंतर्गत वाकड, थेरगाव आणि निगडी येथे कारवाई, 3 महिलांविरोधात गुन्हा

पिंपरी चिंचवड | दारुबंदी कायद्याअंतर्गत वाकड, थेरगाव आणि निगडी येथे कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी तीन महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी (दि.10) या तिन्ही ठिकाणी कारवाई करण्यात आली.बौद्ध विहार वेणूनगर, वाकड याठिकाणी केलेल्या कारवाईत 85 लिटर गावठी हातभट्टी दारू जप्त करण्यात आले. याप्रकरणी साधना करण कुंभार (वय 22, रा. वेणू नगर, वाकड) हिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संत ज्ञानेश्वर कॉलनी, थेरगाव येथे वाकड पोलिसांनी कारवाई केली. याप्रकरणी शारदा बाला राठोड (वय 30, रा. संत ज्ञानेश्वर कॉलनी, थेरगाव) हिच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून 280 लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली आहे.

ओटास्किम, निगडी येथील कारवाईत 16 लिटर हातभट्टी दारु निगडी पोलिसांनी जप्त केली आहे. याप्रकरणी शांताबाई दिलीप विटकर (वय 50, रा. ओटास्किम, निगडी हिच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button