breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

देवेंद्र फडणवीसांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला अटक

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काही दिवसांपूर्वी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. दरम्यान या धमकी देणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत.पोलिसांकडून मुख्य आरोपी किंचक नवले याचा  शोध सुरू होता. तो वेशांतर करून वेगवेगळ्या ठिकाणी राहत असल्याचे तपासात समोर आले. अखेर सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने सांताक्रूझ पोलिसांनी त्याला शनिवारी सातारा येथील सदर बाझार येथून अटक केली.

याप्रकरणी सत्ताधारी शिवसेनेच्या युवा शाखेचे शहर पदाधिकारी अक्षय पनवेलकर यांनी  सांताक्रूझ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. एका मुलाखतीदरम्यान एका अज्ञात व्यक्तीने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात आक्षेपार्ह भाषा वापरली आणि भाजप नेत्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटलं आहे.

हेही वाचा – लोकसभा निवडणूकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर, महाराष्ट्रातील जागांबाबत मोठा सस्पेन्स

त्यानंतर त्याला मुंबईत आणून वांद्रे न्यायालयात हजर केले. ‘अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना जिवे ठार मारण्याची धमकी कोणाच्या सांगण्यावरून दिली आणि तो व्हिडिओ कोणाच्या सांगण्यावरून अपलोड करत व्हायरल केला, या कटात आणखी कोण सामील आहे, याबाबतच्या चौकशीसाठी दहा दिवसांची पोलिस कोठडी आवश्यक आहे’, असे म्हणणे पोलिसांनी न्यायालयासमोर मांडले.न्यायाधीशांनी नवलेची दहा दिवसांच्या ऐवजी पाच दिवसांची पोलिस कोठडी पोलिसांना मंजूर केली.

तसेच  हा प्रक्षोभक भाषा वापरून जिवे ठार मारण्याची धमकी देणारी वक्तव्ये असलेल्या व्हिडिओ आपल्या ‘एक्स’ हँडलवरून व्हायरल करत दोन समाजांत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आधीपासून अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे  सोशल मीडिया सेलचे उपाध्यक्ष योगेश सावंत यांनाही या प्रकरणी न्यायालयाने ७  मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

 

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button