breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

नाशिक मनसेत मोठे फेरबदल; राज ठाकरेंकडून शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्षांच्या नावांवर शिक्कामोर्तब

नाशिक – मनसे अध्यक्ष राज ठाकरेनाशिक दौऱ्यावर  आहेत. मनसेच्या सुरुवातीपासूनच नाशिक खास राहिले आहे. राज ठाकरेंच्या आवाहनाला प्रतिसाद देत नाशिककरांनी महापालिकेची सत्ता हातात दिली होती. राज ठाकरेंनी विविध कंपन्यांचा निधी आणून नाशिकमध्ये विकासही केला होता. परंतू, नंतरच्या निवडणुकीआधी मनसेचे नगरसेवक भाजपात गेल्याने तिथे भाजपाची सत्ता आली होती. यामुळे नाशिक पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी पक्षात मोठा फेरबदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

नाशिक शहराध्यक्षपदी दिलीप दातीर, जिल्हाध्यक्षपदी अंकुश पवार यांची निवड निश्चित करण्यात आली असून लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे. माजी महापौर अशोक मुर्तडक यांचे समर्थक असलेल्या अनंता सुर्यवंशी यांना जिल्हाध्यक्ष पदावरून हटविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

फेब्रुवारी 2022 मध्ये 18 महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. त्यात मुंबई, ठाणे, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, पनवेल, मिरा-भाईंदर, पिंपरी-चिंचवड, पुणे, सोलापूर, नाशिक, मालेगाव, परभणी, नांदेड-वाघाळा, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर आणि चंद्रपूर यांचा समावेश आहे. यामुळे मनसेसह अन्य पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर देत आहेत. पदाधिकारी बदलले जात आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button