breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

सावधान… महिलांचं व्हॉट्सऍप, फेसबुक स्टेटस सतत पाहाल, तर जेलवारी घडू शकते

हा भारतीय दंड विधान 354 ड नुसार गंभीर गुन्हा, विनयभंगाचा गुन्हा दाखल होईल.

मुंबई – सोशल मीडिया वापरणाऱ्यांसाठी एक सावधगिरीचा इशारा आहे. महिलांचं व्हॉट्सऍप किंवा फेसबुक स्टेटस सतत पाहात असाल तर तुम्हाला जेलवारी घडू शकते. तुम्हाला महिलांची व्हॉट्सऍप, फेसबुक स्टेट्स पाहायला आवडतात? पण जरा सांभाळून. एखाद्या महिलेचं व्हॉट्सऍप किंवा फेसबुक स्टेट्स सतत पाहात असाल तर जेलची हवा खावी लागेल. तुमच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल होईल.

एखाद्या महिलेनं किंवा मुलीनं तिचं व्हॉट्सऍप स्टेटस बदललं की तातडीनं ते पाहायची तुमची खोड असेल तर ती तुम्ही सोडून देणंच उत्तम. कारण एखाद्या महिलेचं तातडीनं स्टेटस पाहणं म्हणजे तिच्यावर चोरून नजर ठेवण्यासारखं आहे. हा भारतीय दंड विधान 354 ड नुसार गंभीर गुन्हा आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलेवर चोरून नजर ठेवली तर पहिल्या गुन्ह्यासाठी 3 वर्षे जेल आणि दंड तर दुसऱ्यांदा हाच गुन्हा केल्यास 5 वर्षे कारावास आणि दंड अशा शिक्षेची तरतूद आहे.

महिला सहसा अशा गुन्ह्यांच्या तक्रारी करण्यासाठी पुढे येत नसल्यामुळे गुन्हेगारांचं धाडस वाढतं..त्यामुळे महिलांनी या नराधमांना धडा शिकवण्यासाठी पुढे आल्यास या गुन्हेगारांना जरब तर बसेलच पण भविष्यातले गुन्हेही टळण्यास मदत होईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button