TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

विजेता फाऊंडेशनतर्फे स्त्री-सन्मानासाठी अनोखा उपक्रम

  • अध्यक्षा ॲड. श्वेता विजय इंगळे- सरकार यांची सामाजिक बांधिलकी
  • विधवा, परित्यक्ता, सफाई कामगार, तृतीय पंथी महिलांना मायेचे माहेर

पिंपरी : प्रतिनिधी

‘‘स्त्री प्रित मे राधा बने|
गृहस्थी मे बने जानकी।
काली बनकर शिश काटे।
जब बात हो सम्मान की।

अगदी ह्याच उक्तीप्रमाणे स्त्रीसन्मानाची आगळीवेगळी पूजा करत विजेता फाऊंडेशनतर्फे एका नव्या अभिनव उपक्रमाने सामाजिक बांधिलकी मायेच्या ममतेने जोपासली आहे.

विजेता फाऊंडेशन, पुणे यांच्या माध्यमातून नवरात्रीच्या पाचव्या दिवसापासून ते कोजागिरीपर्यंत विधवा, परित्यक्ता, सफाई कामगार, घरकाम करणाऱ्या स्वाभिमानी रागिणी आणि तृतीय पंथी भगिनी अशा १०१ भगिनींच्या स्वाभिमानाची पूजा करून त्यांची मायेचे माहेर म्हणून साडीचोळीने ओटी भरुन नवरात्रीची स्त्री सन्मानाची पूजा करण्यात आली.


यावेळी अध्यक्षा-त्रितीया फाऊंडेशन, हडपसर पुणे. सभासद – मंगलमुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्ट पुणे. ह्यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली तसेच ह्या भगिनींच्या वतीने महात्मा गांधी आणि महालक्ष्मी यांच्या फोटोचे पूजन करून दिपप्रज्वलन केले त्यावेळी विजेता फाऊंडेशन चे सचिव श्री. विजय इंगळे – सरकार, खजिनदार सौ. लक्ष्मी सूर्यवंशी आणि सदस्य चि. कौन्तेय इंगळे, सौ. आदिती वाघ व विजया कडूस तसेच सत्ता प्रतिष्ठानचे संस्थापक सौरभ शिंदे, सदस्य मयूर तिखे आणि ग्रुप व तृतीयपंथी भगिनी कादंबरी, मन्नत, आरोही, श्रुती, मायरा, सेजल आणि ग्रुप उपस्थित होते.

याप्रसंगी विजेता फाऊंडेशनच्या संस्थापक – अध्यक्ष डॉ. ॲड. श्वेता विजय इंगळे- सरकार म्हणाल्या की, खऱ्या अर्थाने नवरात्रीच्या खऱ्या नवदुर्गांची मी पूजा केली ह्याचे अंतरीक समाधान मला शब्दात व्यक्त करता येणार नाही इतके अमूल्य आहे….! दगडाच्या स्त्रिशक्ती प्रतिकरूपी देवीची पूजा करण्यापेक्षा समाजात उपेक्षित असणाऱ्या माझ्या ह्या भगिनींच्या कर्तव्याची, आत्मसन्मानाची, स्वाभिमानाची आणि माणूस म्हणून जगण्यासाठी कराव्या लागणाऱ्या संघर्षाची पूजा करुन त्यांची माहेर म्हणून मायेने ओटी भरताना मला मिळालेला आनंद म्हणजेच खरीखुरी नवरात्री मी साजरी केल्याचा आंतरीक आनंद मला वाटतो. आज तृतीयपंथी भगिनींना मी मायेचे माहेर दिले आणि अतिशय आत्मियतेने आणि अंतर्मनातून त्यांचे चरण पूजन केले.
ह्या कार्यक्रमासाठी विधवा व परित्यक्ता भगिनींच्याच्या वतीने श्रीमती मीना मोरे, घरकाम करणाऱ्या भगिनींच्या वतीने मनिषा बिरादार, सफाई कामगार भगिनींच्या वतीने सफाई कामगार मुकादम कविता भोईर आणि तृतीयपंथी भगिनींच्या वतीने कादंबरी – तृतीयपंथी महिला सामाजिक कार्यकर्ती आदी उपस्थित होत्या.

संघर्ष हा नवनिर्मितीची सुरूवात…
संघर्ष हा नवनिर्मितीची सुरूवात असते आणि हे अगदीच जरी खरे असले तरी त्या संघर्षाला मायेची ऊब हवी असते हे देखील काही खोटं नाही..! म्हणूनच अशा संघर्ष करणाऱ्या माझ्या ह्या भगिनींचे मी आज त्यांची बहीण म्हणून कोजागिरी निमित्ताने त्यांचे चरण लक्ष्मीस्वरूप मानून पूजन केले; त्यांना ओवाळले आणि मायेचे माहेर म्हणून साडीचोळीने ओटी भरली. हे जे पण काही मी केले ते अगदी अंतर्आत्म्यातून केले आहे. कोणी मला लाखो रूपयांची गिफ्ट दिल्यानेही जो आनंद मला वाटला नसता तो आज मला ह्या भगिनींच्या स्वाभिमानाची पूजा केल्याने वाटला आहे, अशा भावना यावेळी विजया फाऊंडेशनच्या संस्थापक – अध्यक्ष डॉ. ॲड. सौ. श्वेता विजय इंगळे- सरकार यांनी व्यक्त केल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button