TOP Newsताज्या घडामोडीपुणे

शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आराखडा

पुणे : पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुणे नॉलेज क्लस्टरने पुढाकार घेतला आहे. मेट्रो आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील इतर घटकांमध्ये समन्वय वाढवण्यासाठी आराखडा तयार करण्यात येत आहे. येत्या दोन महिन्यांत हा आराखडा तयार होईल, अशी माहिती पुणे नॉलेज क्लस्टरचे मुख्य संशोधक प्रा. अजित केंभावी यांनी शुकवारी दिली.पुण्यातील वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरातील विविध रस्त्यांवर सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीचा वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

वाहतूक कोंडीवर उपाय ठरू शकण्याचा दावा असलेला मेट्रो प्रकल्प अद्याप पूर्ण झालेला नाही. तसेच पीएमपीएमएलची बस व्यवस्थाही सक्षम नाही. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर प्रचंड प्रमाणात खासगी वाहने वापरली जातात. काही दिवसांपूर्वी मर्सिडिज कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, आमदार आदित्य ठाकरे पुण्याच्या वाहतूक कोंडीत अडकल्याची चर्चा झाली होती.

या पार्श्वभूमीवर पुणे नॉलेज क्लस्टरने वाहतूक कोंडीवर उपाय शोधण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्याबाबत प्रा. केंभावी म्हणाले, की पुण्यातील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढत असल्याने त्यावर तोडगा काढण्याची गरज आहे. वाहतूक कोंडीचा प्रश्न न सुटल्यास पुणे बेंगळुरूलाही मागे टाकण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीवर शाश्वत पर्यायासाठीचा आराखडा पुणे नॉलेज क्लस्टर तयार करत आहे. त्यात मेट्रो, पीएमपीएमएल बस, रिक्षा, टॅक्सी सेवा यांच्यात अधिकाधिक समन्वय साधून सार्वजनिक वाहतूक समस्या बळकट करण्याच्या उपाययोजना करण्यात येतील.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button