TOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराष्ट्रिय

सरदार पटेलांचा आदर न करणाऱ्यांना गुजरातमध्ये स्थान नाही; पंतप्रधान मोदींचा इशारा

अहमदाबाद । विशेष प्रतिनिधी ।

ज्यांनी गुजरातच्या हिताच्या विरोधात काम केले आणि मला 20 वर्षे त्रास दिला, त्यांनी न्यायालयात जाऊन गुजरातची बदनामी केली आहे. काँग्रेस नेत्यांना विचारा की, त्यांनी ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ला भेट दिली आहे का? जे लोक पृथ्वीपुत्र सरदार पटेल यांचा आदर करत नाहीत त्यांना गुजरातमध्ये नाही, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी राजकोट जिल्ह्यातील जमकंदोर्ना येथे जाहीर सभेला संबोधित केले, यावेळी पंतप्रधान मोदींना ऐकण्यासाठी हजारो लोक जमले होते. या सभेतून पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर सटकून टीका केली आहे. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत सरकार भ्रष्टाचार संपवत आहे, त्यामुळे काही लोक सरकारची बदनामी करतायत. एक काळ असा होता की, ज्यावेळी अहमदाबादमध्ये कर्फ्यू नाही का याचा तपास करावा लागला होता.

सिक्स लेन हायवे, रॅपिड ट्रान्सपोर्ट गुजरातची खरी ओळख
गुजरातच्या विकासाबाबत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, चौपदरी, सहा पदरी महामार्ग आणि वेगवान वाहतूक ही गुजरातची ओळख बनली आहे. मेडिकलमध्ये पूर्वी त्यांनाच प्रवेश दिला जात होता ज्यांना इंग्रजी येत होते. आता आम्ही गुजराती भाषेत मेडिकल आणि इंजिनियरिंगच्या अभ्यासाला परवानगी देत आहोत. त्यामुळे गावातील विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button