breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

कोल्हापूर : हातकणंगले, शिरोळ तालुक्यातील अपंगांसाठी इचलकंरजीत उपजिल्हा रुग्णालय उभारा

कुंभोज । प्रतिनिधी

हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील जवळजवळ 45 हजार अपंगांना न्याय देण्यासाठी इचलकंजी येथे उपजिल्हा रुग्णालय स्थापन करण्यात यावे, अपंगांना 50 टक्के घरफाळा सवलत, पाच टक्के ग्रामपंचायत निधी, अन्नसुरक्षा 35 किलो धान्य मिळावे तसेच कोरोना कालावधीत अपंगाचा कुटुंबीयांना लाईट बिल माफ करावे असे आव्हान कोल्हापूर जिल्हा प्रहार संघटनेचे उपाध्यक्ष तुकाराम पाटील भादोले यांनी केले.

ते कुंभोज तालुका हातकणंगले येथे अपंगांना असणाऱ्या विविध योजनेसंदर्भातील सद्गुरु शिवानंद महाराज मठ येथे प्रहार संघटनेच्या वतीने आयोजित अपंग मेळाव्यात बोलत प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुनील पाटील होते यावेळी बोलताना हातकणंगले शिरोळ तालुक्यात 45000 वेगवेगळ्या स्वरूपातील अपंग लोकांची संख्या असून, अपंग लोकांना कोल्हापूर येथे दाखले व अन्य कामासाठी जाताना मोठा त्रास सोसावा लागतो त्यासाठी शासनाने इंचलकरंजी आयजीएम रुग्णालयात उपजिल्हा रुग्णालय स्थापन करून अपंगांची सोय करावी, अपंग बीज भांडवल कार्यालय पुन्हा चालू करावे, शासनाने UID कार्ड काढण्यासाठी अपंगांना मदत करावी, ग्रामपंचायतीने अपंगांना आय कार्ड द्यावे, अपंगांसाठी असणाऱ्या कर्ज योजनेच्या जाचक अटी रद्द कराव्यात अपंगांना घरपोच पोस्टाद्वारे पेन्शन योजना राबवावी, अपंगांनी एकत्रित येऊन आपल्या मागण्यांसाठी लढा उभारल्यास शासन दरबारी नक्की यश मिळेल व त्यासाठी आमदार बच्चू कडू प्रणित प्रहार संघटना आपल्या सदैव पाठीशी असेल असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.

यावेळी सुनील पाटील यांनी अपंगांच्या असणाऱ्या विविध योजना धार्मिक सामाजिक संस्कृतीक ठिकाणी असणारे अपंगांच्या आरक्षण त्याच पद्धतीने अपंग वधु वर विवाह केल्यास होणारे फायदे, अंत्योदय योजना, शैक्षणिक सवलत,खाजगी नोकरीत असणारे आरक्षण, टोल नाका माफ, अपंगांना रोड टॅक्स माप, लाईट बिल, शेती साठी असणाऱ्या योजना, गॅस कनेक्शन आदींची माहिती अपंग मेळाव्याप्रसंगी सर्वांना दिली. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार कुंभोज प्रहार संघटना त्यांच्या वतीने करण्यात आला.

यावेळी तुकाराम पाटील भादोले, सुनील पाटील इचलकरंजी, इरफान बागवान इचलकरंजी ,प्रदीप अवघडे भादोले, नंदकुमार माळी, उपसरपंच जहांगीर हजरत, अनिल माळी,सुरेश कोळी, शिवाजी घोदे, शहनवाज मकानदार, गणेश सपकाळ, दादा अंगारे, तसेच प्रहार संघटनेचे कार्यकर्ते आदी मान्यवर उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button