Uncategorizedताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

मुख्यमंत्री शिंदेंच्या खास माणसाच्या बालेकिल्ल्यात युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांची सभा

रायगड/महाड : कोकणात रायगड जिल्ह्यात दक्षिण रायगडमध्ये म्हणजेच आमदार भरत गोगावले आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे प्रतोद  यांच्या बालेकिल्ल्यात युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांची सभा होणार आहे. आदित्य ठाकरे ) यांची निष्ठा यात्रा संध्याकाळी ४ वाजता महाडमध्ये होत आहे, अशी माहिती शिवसेना दक्षिण रायगड जिल्हाप्रमुख अनिल नवगुणे यांनी दिली आहे. यामुळे या सभेत आदित्य ठाकरे काय बोलणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. आदित्य ठाकरे यांच्याबरोबर कोण नेते उपस्थित राहतात याचीही उत्सुकता अनेकांना आहे.

शिंदे गटात जाण्याआधी सहा महिन्यांपूर्वी रायगड जिल्ह्यात शिवसेना व राष्ट्रवादी आमने सामने आले होते. खासदार सुनील तटकरे यांच्यावरही जाहीर नाराजी व्यक्त केली होती. या सगळ्या नाराजीची राजकीय घडामोडीची पार्श्वभूमी रायगडमधून शिंदे गटाला बळ देण्यास पुरक ठरली होती. तेव्हाही मातोश्रीकडून कोणतीही थेट भूमिका मांडण्यात आली नव्हती. यामुळे आजच्या आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याला महत्त्व आले आहे. शिवसेनेतून बाहेर पडून स्वतंत्र गट स्थापन करणाऱ्या एकनाथ शिंदे  गटाचे पक्ष प्रतोद आमदार भरत गोगावले व इतर दोन आमदार पहिल्या टप्प्यातच सहभागी झाले होते.

गेले महिनाभर शिवसेनेच्या दोन्ही गटात आरोप प्रत्यारोपांनी परिसीमा गाठली आहे. शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले हे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. शिवसेनच्या माध्यमातून गोगावले तीन वेळा आमदार झाले. सुरवातीच्या भाजप – शिवसेना युतीमध्ये अणि त्यानंतर महाविकास आघाडीमध्ये मंत्रिपद न मिळाल्याने गोगावले नाराज होते. त्यातच राष्ट्रवादीसोबतच्या आघाडीला गोगावले यांचाही विरोधच होता. यामुळे त्यांनी शिंदे गटाची वाट धरली. गेले अनेक दिवस दूर गेलेले माजी खासदार अनंत गीतेंनीही गोगावले यांच्यावर शिंदे गटात गेल्याने टीका केली होती. राष्ट्रवादीकडून सातत्याने होणारा अन्याय, शिवसेना पक्षप्रमुखांकडून कधीही विश्वासात घेण्यात आले नाही. आमदारांची व्यथा त्यांनी कधी ऐकली नाही, असं गोगावले यांनी यापूर्वीच सांगितलं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या निष्ठा सभेला विशेष महत्त्व आलं आहे.

गेली तीन टर्म आमदार असलेले गोगावले यांचा महाड विधानसभा मतदारसंघात उत्तम संपर्क आहे. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे काय बोलणार? याकडे अनेकांचे लक्ष लागलं आहे. महाड, पोलादपूर, माणगाव हे तिन्ही तालुके शिवसेनेचे बालेकिल्ले राहिले आहेत. महाडमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ही सभा होत आहे. या सभेला महाड, माणगाव, पोलादपूरमधील परिसरातील कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button