breaking-newsमनोरंजन

रॅपर बादशाहची फेक फॉलोवर केस प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेकडून चार तास चौकशी

मुंबई : मुंबई गुन्हे शाखेच्या सेंट्रल इंटेलिजन्स युनिटकडून सोशल मीडियावर गैरप्रकारे फॉलोवर वाढवण्याचं एक रॅकेट उघडकीस करण्यात आलं होतं. या प्रकरणात गुन्हे शाखेच्या सेंट्रल इंटेलिजन्स युनिटकडून एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमधील काही लोकांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. याच प्रकरणात आज रॅपर बादशाहची 4 तास चौकशी करण्यात आली. 7 ऑगस्टला 12 वाजता त्याला पुन्हा बोलवण्यात आलं आहे.

बादशाहचा इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ आहे, ज्याच्यावर लाखोंच्या संख्येत त्याला लाइक्स आणि व्युज मिळाले आहेत. कुठल्या दिवशी हजारोंच्या संख्येने तर एखाद्या दिवशी लाखोंच्या संख्येने या व्हिडिओवर लाइक्स मिळाले आहेत. बादशाहाकडून गुन्हे शाखेला 238 प्रश्नांची उत्तरे अपेक्षित आहेत, जी त्यांना या तपासामध्ये मदत करतील.

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख हे स्वतः या प्रकरणामध्ये बारकाईने लक्ष ठेवून आहेत, या प्रकरणामध्ये काही पीआर एजन्सिज आहेत, जे असे फेक लाईक्स आणि व्युज काही बड्या व्यक्तींना पुरवण्याचं काम करत असतात. या एजन्सीजवर सुद्धा क्राइम ब्रांचची करडी नजर आहे. या प्रकरणात आत्तापर्यंत दोघांना अटक करण्यात आली आहे.

सोशल मीडिया स्कॅममध्ये मुंबई क्राईम ब्रांचने काशीफ मनसूर (वय 30) ला अटक केली होती. तो पेशाने एक सिव्हिल इंजिनियर आहे. www.amvsmm.com या वेबसाईट वरुन काशिफ मनसूर हा गोरख धंदा चालवत होता. इंस्टाग्राम, ट्विटर, फेसबुक अशा विविध सोशल मीडियावर सिनेमा, स्पोर्ट्स आणि इतर क्षेत्रातील नामवंत व्यक्तींचे प्रोफाईल हॅक करून फेक लाईक्स आणि फॉलोवर्स पुरवण्याचं काम करत होता.

काशिफ मनसुरने सोशल मीडियावर लाईक आणि कमेंटच्या 25 हजारच्या ऑर्डर पूर्ण केल्या असून दोन कोटी तीन लाख फॉलोअर्स त्याने अवैधरित्या वाढवले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button