ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मोहननगर येथे शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा बसविणार

पिंपरी चिंचवड | चिंचचड मोहननगर येथील सांस्कृतिक भवनात श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात येणार आहे. तसेच इतर अनुषंगिक कामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी वास्तुविशारदाची नेमणूक करण्यात येणार आहे.पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिंचवड- मोहननगर येथील सांस्कृतिक भवनात श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात येणार आहे. हा प्रकल्प वैशिष्ट्यपूर्ण असल्याने नकाशे बनविणे, प्लॅनिंग व डिझाइन तयार करणे, अंदाजपत्रक तयार करणे, निविदा प्रसिद्ध करणे तसेच निविदापूर्व आणि निविदापश्चात सर्व कामे करण्यासाठी वास्तुविशारदाची नेमणूक करणे अत्यावश्यक आहे.

याबाबत महापालिकेच्या अधिकृत वेबसाइटवर सल्लागारांकडून दरपत्रक मागविण्यासाठी 6 मे 2021 रोजी नोटीस प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार, सृष्टी डिझायनर यांनी 2 टक्के लघुत्तम दर सादर केला. सृष्टी डिझायनर यांचा लघुत्तम दर असल्याने त्यांची निविदापूर्व आणि निविदापश्चात कामांसाठी वास्तुविशारद म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे. त्यांना निविदापूर्व कामांसाठी 0.50 टक्के आणि निविदापश्चात कामांसाठी 1.50 टक्के शुल्क देण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button