breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

पोलिसांना मदत करण्यासाठी नेमलेल्या सायबर तज्ञाकडूनच बिटकॉइनच्या पैशातून मनिलाँडरिंग

पुणे |

बिटकॉइन प्रकरणात पोलिसांना मदत करण्यासाठी नेमलेल्या सायबरतज्ज्ञ पंकज घोडे याने ‘डेटा’चा वापर करून घेतलेल्या बिटकॉइनमध्ये मनिलाँडरिंग केले असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे त्यांच्या ‘के-वायसी’ व ‘नॉन केवायसी’ वॉलेटचे विश्लेषण केले जात आहे. बिटकॉइन या आभासी चलनाच्या (क्रिप्टोकरन्सी) फसवणूक प्रकरणात सायबरतज्ज्ञ म्हणून पंकज प्रकाश घोडे (रा. ताडीवाला रोड) आणि माजी आयपीएस अधिकारी रवींद्र प्रभाकर पाटील (रा. बिबवेवाडी) यांची नेमणूक करण्यात आली होती. या गुन्ह्याच्या तपासात त्या वेळी अटक केलेल्या आरोपींकडील ‘डेटा’चा गैरवापर करून या दोघांनी परस्पर बिटकॉइन घेतल्याचे आढळून आले आहे.

पाटील याच्याकडे केलेल्या तपासात त्याने आतापर्यंत २४० बिटकॉइन घेतले आहेत. त्याने घेतलेल्या बिटकॉइनच्या रकमेतून १२ कोटी रुपयांचे दोन फ्लॅट, एक मोटार घेतल्याचे तपासात आढळले आहे. दुसरा आरोपी पंकज घोडे हा तपासात मदत करीत नाही. त्याच्याकडून पोलिसांनी तीन मोबाइल, दोन मॅकबुक, तीन हार्ड डिस्क, दोन टँब, दोन लॅपटॉप, चार सिडी, सहा पेनड्राइव्ह, दोन मेमरी कार्ड असा डेटा जप्त केला आहे. या ‘डेटा’चे पोलिसांनी विश्लेषण केले असता घोडे याने काही बिटकॉइन इतर वॉलेटवर वळविल्याचे दिसत आहे. घोडे याने तपासात त्याचे एकही क्रिप्टो वॉलेट नसल्याचे पोलिसांना सांगितले होते.

मात्र, त्याच्या ‘डेटा’चे विश्लेषण केले असता अनेक वेळा क्रिप्टोकरन्सीचे व्यवहार केले असून, त्याचे स्क्रीनशॉट पोलिसांना मिळाले आहेत. त्यामुळे आरोपीच्या ‘के-वायसी’ आणि ‘नॉन केवायसी’ ‘डेटा’चे विश्लेषण सुरू आहे. या सर्व क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून आरोपीने मोठ्या प्रमाण मनिलाँडरिंग केले असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. त्या दृष्टीने पोलिस तपास करीत आहेत. त्या वेळी अटक केलेल्या आरोपींच्या खात्यावरून जर्मनी, इस्राईल, फान्स, अमेरिका येथील क्रिप्टो वॉलेटवर बिटकॉइन वळविल्याचे दिसत आहे. त्या सर्व वॉलेटची माहिती घेतली जात आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

  • एक हजार बिटकॉइनचा गैरव्यवहार

बिटकॉइन फसवणूक प्रकरणाचा तपास करताना आरोपींनी एक हजारांजवळ बिटकॉइनचा गैरव्यवहार केल्याचे दिसत आहे. त्यापैकी २४० बिटकॉइन हे माजी आयपीएस अधिकारी रवींद्र पाटील यांच्याकडे मिळाले आहेत. इतर बिटकॉइन नेमके कोणी व कोणाच्या क्रिप्टो वॉलेटवर वळविले याचा तपास पोलिस करीत आहेत..

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button