breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

…अन् स्थायी समिती सभापती पदाची माळ पडली यांच्या गळ्यात

  • महापालिकेवर भोसरी मतदार संघाचे वर्चस्व कायम
  • चिंचवड मतदार संघ बॅकफुटवर

पिंपरी / महाईन्यूज

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी भाजपकडून नगरसेवक नितीन लांडगे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांचा अर्ज आज दाखल करण्यात आला असून निवडणुकीची केवळ औपचारिकता बाकी राहिलेली आहे.

स्थायीच्या चाव्या ताब्यात घेण्यासाठी भाजपमधील चिंचवड मतदार संघ आणि भोसरी मतदार संघातील गटांमध्ये चूरस निर्माण झाली होती. सभापती पदावर संधी मिळाल्यास संबंधीत पदाधिकारी डोईजड होऊ नये यासाठी दोन्ही गटाच्या प्रमुखांकडून नियोजित कार्यक्रम आखला होता.

अखेर नितीन लांडगे यांचा अर्ज दाखल करून घेण्यात आला. त्यासाठी नगरसेवक अंबरनाथ कांबळे यांनी सूचना मांडली तर, अपक्ष आघाडीच्या नगरसेविका निता पाडाळे यांनी अनुमोदन दिले आहे.

केवळ निवडणूक घेण्याची औपचारिकता बाकी राहिलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button