breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

रोहित शर्माला हे ५ विक्रम करण्याची संधी, कोहलीचा ‘विराट’ रेकॉर्ड निशान्यावर

IND vs AFG : हित शर्माचं अफगाणिस्तान विरुद्धच्या टी-२० मालिकेतून टीम इंडियात कमबॅक झाल्याने भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. ३ सामन्यांच्या टी-२० मालिकेचं आयोजन हे ११ ते १७ जानेवारी दरम्यान करण्यात आलं आहे. रोहित शर्माला या टी-२० सीरिजमध्ये ५ विक्रम करण्याची संधी आहे.

४ हजार धावा : रोहितला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४ हजार धावा पूर्ण करण्याची संधी आहे. रोहितला ४ हजार धावांचा पल्ला गाठण्यासाठी १४७ धावांची गरज आहे. रोहितच्या नावावर सध्या ३ हजार ८५३ धावा आहेत.

विराटला मागे टाकण्याची संधी : रोहितकडे विराटला मागे टाकून टी-२० मध्ये सर्वाधिक धावांचा वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची संधी आहे. त्यासाठी रोहितला १५६ धावा कराव्या लागतील. विराटच्या नावावर सध्या ४ हजार ८ धावा आहेत.

हेही वाचा   –  शरद पवार यापुढे निवडणूक लढणार नाहीत, नेमकं कारण काय?

सर्वाधिक टी-२० शतकं : रोहितला टी-२० मध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम करण्याची संधी आहे. सूर्या आणि रोहितच्या नावावर ४ शतकं आहेत. त्यामुळे रोहितने आणखी १ शतक ठोकल्यास तो टी-२० मध्ये सर्वाधिक शतकं करणारा फलंदाज ठरेल.

बाबर आझमला मागे टाकण्याची संधी : टी-२० क्रिकेटमध्ये रोहितला पाकिस्तानच्या बाबर आझमला याला मागे सोडण्याची संधी आहे. बाबर आझमच्या नावावर ३० अर्धशतकं आहेत. रोहितने अफगाणिस्तान विरुद्ध १ अर्धशतक केल्यास बाबरच्या विक्रमाची बरोबरी होईल. तर २ अर्धशतक केल्यास रोहित बाबरला मागे टाकेल.

सर्वाधिक टी-२० चौकार : सध्या विराट कोहली टीम इंडियाकडून सर्वाधिक चौकार मारणारा फलंदाज आहे. विराटने आतापर्यंत ३५६ चौकार लगावले आहेत. तर रोहितच्या नावावर ३४८ चौकार आहेत. त्यामुळे रोहित विराटला मागे टाकण्यापासून फक्त ९ चौकार दूर आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button