breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

सीआयडीकडून विनायक मेटेंच्या ड्रायव्हरविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे अपघातप्रकरणी त्यांच्या चालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीआयडीनं मेटेंच्या वाहनचालकाची कसून चौकशी केल्यानंतर रसायनी पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचा 14 ऑगस्टला अपघाती मृत्यू झाला होता. रसायनी पोलिसांनी यात प्राथमिक चौकशी केली, त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवला. सीआयडीने तपास केल्यानंतर मेटेंच्या वाहनचालकाविरोधात रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय, मात्र तपास महाराष्ट्र सीआयडीकडूनच सुरू आहे. सीआयडीच्या चौकशीत चालकाच्या चुकीमुळे हा अपघात झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आलाय.

गेल्या काही दिवसांपूर्वी 14 ऑगस्टला मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख विनायक मेटे (52) यांचा अपघाती मृत्यू झाला होता. मराठा समाजाच्या सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात आरक्षणाचे कट्टर समर्थक असलेले माजी विधान परिषद सदस्य विनायक मेटे हे मराठ्यांच्या नोकरीतील टक्क्याच्या मुद्द्यावरच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी मुंबईला जात होते. यादरम्यान त्यांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला.

मराठा समाजाचे नेते विनायक मेटे यांचा 14 ऑगस्टला सकाळी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर झालेल्या अपघातात मृत्यू झाला. पाच वेळा विधान परिषदेचे सदस्य राहिलेले मेटे हे शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष होते. मुंबईत समुद्राखाली बांधण्यात येणाऱ्या शिवस्मारक समितीचेही ते अध्यक्ष होते. मेटे यांच्यावर 15 ऑगस्टला दुपारी त्यांच्या मूळ गावी बीड येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावलेल्या महत्त्वाच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी 52 वर्षीय विनायक मेटे 14 ऑगस्टला रात्री बीडहून मुंबईकडे रवाना झाले होते. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पहाटे 5.30 वाजता एका ट्रकने त्यांच्या कारला ओव्हरटेक केले, त्यामुळे कार चालकाचे नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाला. लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान चालकाच्या डोळ्यावर अंधारी आली असावी, ज्यामुळे कार आणि ट्रकची धडक झाली, असा पोलिसांचा संशय होता. या अपघातात मेटेंच्या कारचा चालक एकनाथ कदमही जखमी झाले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button