breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

10वी 12वी चे निकाल जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत लागण्याची शक्यता…

देशभरामध्ये कोरोना व्हायरसमुळे सध्या भीतीचं आणि तणावाचं वातवरण निर्माण झालं आहे… अशा परिस्थितीमध्ये CBSE आणि ICSE बोर्डाने यंदाच्या 10 वी 12वीच्या परीक्षा रद्द करण्याची तयारी दाखवली आहे. याबाबत सुरू असलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीमध्ये आज म्हणजे 26 जुलै रोजा निकालाबाबतही चर्चा झाली. सरासरी गुणदान पद्धतीच्या आधारे यंदा CBSE आणि ICSE बोर्ड जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत निकाल लागू शकतात अशी माहिती देखील आज सर्वोच्च न्यायालयात देण्यात आली आहे.

दरम्यान दोन्ही बोर्डांकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या बोर्डाची परीक्षा रद्द झाली असली तरीही सरासरी गुणांप्रमाणे खूष नसलेल्यांसाठी भविष्यात पुन्हा परीक्षांचे नवं वेळापत्रक जाहीर करून परीक्षा देण्याची संधी विद्यार्थ्यांना दिली जाईल अशी माहितीदेखील आज सर्वोच्च न्यायालयात देण्यात आली आहे.

ICSE बोर्डाचे वकील जयदीप गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही बोर्डांची अ‍ॅफिडेव्हिट्स थोड्या फार फरकाने सारखीच आहेत. मात्र सरासरी गुण देण्याच्या पद्धतींमध्ये थोडा फरक आहे.

यंदा फेब्रुवारी -मार्च 2020 मध्ये दोन्ही बोर्डाच्या परीक्षा सुरू झाल्या होत्या. काही विषयांचे पेपर झाले आहे. मात्र तेव्हापासून देशात कोरोनाची दहशत पसरायला सुरूवात झाली आणि विद्यार्थ्यांची सुरक्षा पाहता परीक्षा लांबणीवर टाकल्या होत्या. जुलै महिन्यात पुन्हा परीक्षा घेण्याची तयारी होती मात्र महाराष्ट्र, दिल्ली सह देशात कोरोना बाधितांचा वाढता आकडा पाहता आता ही रद्द करण्याची तयारी बोर्डाकडून दाखवण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button