breaking-newsपिंपरी / चिंचवड

पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाकडून हातगाड्यावर कारवाई

पिंपरी – पालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने शुक्रवारी (ता. २१) चिंचवडगावातील चापेकर चौक, पिंपरीच्या रिव्हर रोड परिसरात कारवाई केली. यात चार टपऱ्या आणि चार हातगाड्या जप्त केल्या.

चापेकर चौकात विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या चार हातगाडी व्यावसायिकांवर कारवाई करून हातगाड्या जप्त केल्या. कारवाई होताना बघून अन्य काही व्यावसायिक हातगाड्यांसह पसार झाले. तसेच रिव्हर रोड परिसरातील चार टपऱ्याही जप्त केल्या. गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर ही कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान काही व्यावसायिकांनी अतिक्रमणविरोधी पथक व पोलिसांना विरोध केला. शनिवारी (ता. २२) काही भागांत कारवाई करण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button