ओबीसी सभेतून छगन भुजबळांचा जरांगे पाटलांवर जोरदार हल्लाबोल; म्हणाले..

मुंबई : सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यावरून आज ओबीसी नेत्यांनी जालन्यात एल्गार पुकारला आहे. या एल्गार सभेला मंत्री छगन भुजबळ, राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, महादेव जानकर, गोपिचंद पडळकर उपस्थित होते. यावेळी बोलताना छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
छगन भुजबळ म्हणाले, मराठा समाजाचे नवीन झालेले नेते त्यांना हे आरक्षण कळणार नाही, ते त्यांच्या डोक्याच्या बाहेर आहे. कुणाचं खाताय म्हणतो, अरे तुझं खातो काय? यांना काहीच माहित नाही. अरे आरक्षण काय आहे आधी ते तर समजून घे, आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही. छगन भुजबळ दोन वर्ष बेसन भाकर खाऊन आला असा म्हणतो, हो खातो बेसण भाकर कांदा आजही खातो. पण, तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही. आमची सुद्धा लेकरं आहे, तुम्ही वेगळ आरक्षण घ्या.
हेही वाचा – केंद्र सरकारचा जनतेला मोठा दिलासा! LPG गॅस सिलिंडर स्वस्त
उपोषण केले, पोलिसांचा लाठीचार्ज झाला. तो लाठीचार्ज सगळयांनी पहिला. फक्त ७० पोलीस कर्मचारी होते तिथे तेव्हा दगडाचा मारा सुरु झाला. ७० पोलीस काय पाय घसरून पडले का?. महिला आयोगाने त्या महिला पोलिसांना विचारा. शिवाजी महाराजांनी मोघलांच्या सुनेला परत पाठवले पण यांनी काय केले तर महिला पोलिसांवर दगडफेक केली. देवेंद्र फडणवीस यांनी सांगायला हवे होते की माझे पोलीस जखमी झाले. या उलट गृहमंत्री यांनी पोलिसांचे निलंबन केले. हे काय याचे लांगुलचालन सुरू आहे, असंही छगन भुजबळ म्हणाले.





