TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मोशीगावचे ग्रामदैवत श्री नागेश्वर महाराजांच्या मानाच्या विड्यासाठी ९१ लाखांची बोली

पिंपरी | नागेश्वर महाराजांच्या उत्सवास महाशिवरात्रीपासून सुरुवात झाली आहे. या उत्सवात वापरलेल्या वस्तूंचा परंपरागत लिलाव गुरुवारी (दि.३) पार पडला. मोशी गावचे ग्रामदैवत श्री नागेश्वर महाराजांचा शेवटचा मानाचा विडा ९१ लाखांना उद्योजक गणेश तुकाराम कुदळे यांनी घेतला.

मोशीतील नागेश्वर महाराज सभामंडपामध्ये सकाळी दहा वाजल्यापासून लिलावास सुरुवात झाली. उत्सवातील वस्तूंचा लिलाव हा पंचक्रोशीतील भाविकांच्या दृष्टीने एक विशेष पर्वणीचा सण असतो. यामध्ये महाप्रसाद बनविण्यासाठी आणलेल्या वस्तूंचा लिलाव करण्यात येतो. ग्रामस्थांकडून महाप्रसाद बनविण्यासाठी लागणारी भांडी दरवर्षी नव्याने खरेदी केली जातात.
मोशीतील ग्रामदैवत श्री नागेश्वर महाराज यात्रा उत्सवाची सुरुवात झाली. यात्रेत सर्वप्रथम भंडारा उत्सव, उरुस, लिलाव, आखाडा असे स्वरूप असते. भाविकांनी बुधवारपासून मंदिर परिसर आणि आमराईतील नंदादीप परिसरात गर्दी केली होती. शिवाजी महाराज प्रवेशद्वार, मंदिरे, शाळा इमारतीवर रोषणाई केली होती. बुधवारी आमराईमध्ये होम, महापूजा, आरतीनंतर दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली.
असा झाला लिलाव..
गणेश कुदळे यांनी नागेश्वर महाराजांचा मानाचा विडा ९१ लाख रुपयांना घेतला. नागेश्वर महाराजांची मानाची ओटी ३९ लाख २ हजार २२ रुपयांना नीलेश बोराटे यांनी घेतली. नागेश्वर महाराज प्रथम लिलाव चांदीच्या पादुका २२ लाख २ हजार २२ रुपयांना अतिश बारणे यांनी घेतल्या.
नितीन सस्ते आणि विजय सस्ते यांनी मानाचे लिंबू ७ लाख २ हजार २२ रुपयांना घेतले. मानाचे शेवटचे फळ ९ लाख ५५ हजार रुपयांना प्रकाश आल्हाट यांनी घेतले. नागेश्वर महाराजांना अर्पण केलेल्या सोन्याचा मुकुट ६ लाख ८५ हजार रुपयांना हभप धोंडीबा आल्हाट यांनी घेतला. चांदीचा नाग पाच लाख रुपयांना रामभाऊ बोराटे यांनी घेतला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button