TOP Newsटेक -तंत्रताज्या घडामोडीदृष्टीक्षेपमहाराष्ट्रमहिला दिनमुंबईराजकारणराष्ट्रिय

उत्तरप्रदेशातील जौनपूरमध्ये 6 किलोमीटर लांबीच्या रस्त्याला दिले आनंद दिघे यांचे नाव

  • केवळ महाराष्ट्रातच नाही तर उत्तर प्रदेशातही धर्मवीर आनंद दिघे यांचे कट्टर समर्थक

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांचे स्मरण मोठ्या आदराने केले जाते. ठाणे जिल्ह्यातील बाळ ठाकरे म्हणून ओळखले जाणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे आनंद दिघे. राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील स्वतःला आनंद दिघे यांचे शिष्य म्हणवतात. शिवसेनेतील बाळासाहेब ठाकरे यांनी ठाणे जिल्ह्याशी निगडित बाबींमध्ये आनंद दिघे यांच्या निर्णयात हस्तक्षेप केला नाही, दिघे यांच्यावर त्यांचा एवढा विश्वास होता, यावरूनही आनंद दिघे यांचा दरारा समजू शकतो. आनंद दिघे यांचे नाव, त्यांचे कार्य आणि कार्यशैली महाराष्ट्रात अधिक लोकप्रिय आहे. संपूर्ण महाराष्ट्रात, विशेषत: ठाणे जिल्ह्यात त्यांचे प्रचंड चाहते आहेत. पण आज आम्ही तुम्हाला अशा व्यक्तीबद्दल सांगणार आहोत जो आनंद दिघे यांना आपला गुरु मानतात. या प्रेम आणि समर्पणामुळे त्यांनी त्यांच्या मूळ गाव असलेल्या उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यात 6 किलोमीटरचा रस्ता स्वर्गीय आनंद दिघे यांच्या नावाने बांधला आहे.

दिघे यांच्या या कट्टर समर्थकाचे नाव आहे गुलाबचंद दुबे. हा रस्ता त्यांनी स्वखर्चाने 2005 साली बांधला. धरमवीर आनंद दिघे मार्ग असे या रस्त्याचे नाव आहे. हा रस्ता रामपूर ते मे गावाकडे जातो. जो उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील महामार्ग क्रमांक 5 शी जोडलेला आहे. दुबे हे सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचे राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून कार्यरत आहेत.

दिघे यांच्या नावाने रस्ता बांधण्याचा ठराव
गुलाबचंद दुबे यांनी सांगितले की, 1985 मध्ये मी हॉकर्स युनियनसंदर्भात भाषण देत होतो. तेव्हा आनंद दिघे यांची नजर माझ्यावर पडली. त्यांनी माझ्या भाषणाचे कौतुक केले. नंतर मी त्यांच्याशी जोडले आणि त्यानंतर आनंद दिघे यांच्यासोबत वीस वर्षे सतत काम केले. आनंद दिघे यांच्यासारखी माणसे समाजासाठी आदर्श असल्याचे ते म्हणाले. गुलाबचंद दुबे यांनी सांगितले की, दिघे यांच्या निधनानंतर 2005 साली माझ्या मूळ जिल्हा जौनपूरमध्ये हा रस्ता मी बांधला. सर्व खर्च मी स्वतः उचलला, हा रस्ता ६ किलोमीटर लांबीचा आहे.

1986 मध्ये दिघे यांच्यासोबत शिवसैनिक म्हणून रुजू झाले
गुलाबचंद दुबे यांनी सांगितले की, 30 नोव्हेंबर 1986 रोजी मी आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला. दिघे यांच्या नेतृत्वाने मला खूप प्रभावित केले. त्यानंतर दिवसेंदिवस आमचे नाते अधिक घट्ट होत गेले. असा प्रश्न गुलाबचंद दुबे यांना विचारला असता, उत्तर प्रदेशात आनंद दिघे यांच्या नावाने रस्ता तयार करण्यामागचे कारण काय? त्यावर त्यांनी उत्तर दिले की, जर महाराष्ट्रात स्वर्गीय मंगल पांडे रस्ता बनवता येतो, तर उत्तर प्रदेशात आनंद दिघे यांच्या नावाने रस्ता का बांधता येत नाही. दुबे म्हणाले की, सध्या या रस्त्याचे रामपूर नगरपालिकेने नूतनीकरण केले आहे. दुबे सांगतात की, पूर्वी लोक आनंद दिघे यांना गावात ओळखत नव्हते, पण रस्ता तयार झाल्यानंतर हळूहळू सर्वजण त्यांना ओळखू लागले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button