breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

मी पुन्हा येईन…मी पुन्हा येईन…, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवीसांना पाहताच शिवसैनिकांची घोषणाबाजी

मुंबई । महाईन्यूज । ऑनलाईन टीम

आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा 7वा स्मृतीदिन आहे. यानिमित्ताने राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुपारी शिवतीर्थावर जाऊन शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन केले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भाजपाचे नेते विनोद तावडे, पंकजा मुंडे तर शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर यांची उपस्थिती होती. आदरांजली वाहिल्यानंतर फडणवीस परत निघत होते. यावेळी फडणवीसांना बघून शिवसैनिकांनी ‘मी पुन्हा येईन…मी पुन्हा येईन’ अशा घोषणा देणे सुरू केले.

आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा सातवा स्मृतिदिन आहे. यानिमित्ताने अनेक मान्यवरांनी बाळासाहेबांना आदरांजली वाहिली. विशेष म्हणजे बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी विविध पक्षातील नेत्यांसह राज्यभरातून लोक आलेले आहेत. दरम्यान, दुपारी दोन वाजता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवतीर्थावर दाखल झाले. शिवतीर्थावर पुष्प अर्पण करून फडणवीस यांनी बाळासाहेबांना अभिवादन केलं. त्यानंतर ते माध्यमांशी बोलतील अशी अपेक्षा होती. मात्र, माध्यमांच्या प्रतिनिधींजवळ आल्यानंतर त्यांनी हात जोडले. फडणवीस निघून गेल्यानंतर विनोद तावडे आणि पंकजा मुंडे यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. दरम्यान, देवेंद्र फडणवीस परत जात असताना शिवतीर्थावर जमलेल्या शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली. ‘मी पुन्हा येईन… मी पुन्हा येईन…’ अशा घोषणा देत शिवसैनिकांनी भाजपाविरूद्धचा रोष व्यक्त केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button