breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पार्लिमेंटरी एक्झिक्युटिव्ह कमिटी आणि राज्यसभेच्या प्रतोदपदी खासदार अमर साबळे यांची फेरनिवड

पिंपरी, (महाईन्यूज) – आगामी काळ हा भारतीय जनता पक्षाचा सुवर्णकाळ आहे. या सुवर्णकाळात पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांना अनेक चांगल्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्या संधी शहरातील निष्ठावान कार्यकर्त्यांपर्यंत पोहचविण्यासाठी मी स्वतः प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे, असे आश्वासन राज्यसभा खासदार अमर साबळे यांनी दिले.

भारतीय जनता पक्षाच्या संसदीय कार्यकारिणी समितीची फेररचना बुधवारी दिल्ली येथे करण्यात आली. सदर फेररचनेत खासदार अमर साबळे यांची पक्षाच्या संसदीय कार्यकारिणी समितीत तसेच राज्यसभेच्या प्रतोदपदी पुनर्निवड करण्यात आली. त्यानिमित्ताने पिंपरी-चिंचवड शहरातील भाजपा कार्यकर्त्यांनी खासदार अमर साबळे यांचे जंगी स्वागत करून या पुनर्निवडीचा आनंद व्यक्त केला.

याप्रसंगी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस उमा खापरे, नगरसेवक माऊली थोरात, मोरेश्वर शेडगे, केशव घोळवे, प्रकाश जवळकर, नगरसेविका प्रियांका बोरसे, महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा शैला मोळक, दीपाली धानोकर, राधिका बोर्लीकर, राजू दुर्गे, सुभाष सरोदे, मनोज तोरडमल, दिलीप गोसावी, वेणू साबळे, दीपक रोकडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

खासदार साबळे म्हणाले की, पक्षाच्या संसदीय समितीमध्ये तसेच राज्यसभेच्या प्रतोदपदी माझी झालेली पुनर्निवड ही पक्षासाठी झटणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा सन्मान आहे. त्यामुळे ही निवड माझे राजकीय गुरू स्व. गोपीनाथ मुंडे व पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांना समर्पित करतो.

भारतीय जनता पक्ष हा घराणेशाही चालविणारा पक्ष नसून एकनिष्ठपणे काम करणाऱ्या सर्वसामान्य निष्ठावान कार्यकर्त्याला न्याय मिळवून देणारा पक्ष आहे. त्यामुळे आपल्याला संघटित होऊन आपल्या पक्षाची विचारधारा व कार्य शोषित, वंचित, उपेक्षित वर्गाच्या लोकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुमच्या निस्वार्थीपणे केलेल्या कामाची दखल भारतीय जनता पक्ष हा नक्की घेतो. त्यामुळे या पक्षात निष्ठावान कार्यकर्त्यांना निश्चित चांगले भवितव्य असून तुम्हाला चांगली संधी उपलब्ध करून देण्यासाठी मी कायम प्रयत्नशील राहीन, असे आश्वासन खासदार साबळे यांनी यावेळी दिले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button