Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
भोसरीमध्ये 45 वर्षीय व्यक्तीची आत्महत्या
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/images-2.jpg)
पिंपरी : राहत्या घरामध्ये गळफास घेऊन प्रौढाने आत्महत्या केली. ही घटना भोसरी येथे सोमवारी (ता.14) रात्री घडली. प्रकाश महादू शेवाळे (वय ४५ रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) असे आत्महत्या केलेल्या प्रौढाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेवाळे यांनी राहत्या घरामध्ये सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास छताच्या लाकडी वाशाला साडीच्या सहाय्याने गळफास घेतला. ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात आल्यावर त्यांना त्वरित वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. भोसरी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.