breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पे अॅण्ड पार्किंगच्या नावावर सत्ताधारी भाजपकडून जिझिया कर – सचिन साठे

पिंपरी – महापालिकेच्या स्थायी समिती बैठकीत ‘पार्किंग पॉलीसीला’ मंजूरी देण्यात आली. गतवर्षी पाणीपट्टी आणि मिळकत दरात अन्यायकारक वाढ करुन छुपी करवाढ लादली. हे कमी म्हणून आता पार्किंग पॉलीसीच्या नावाखाली जीझिया कर वसूली वाहन धारकांकडून वसूल करणार आहेत, अशी टिका शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी म्हटले आहे.

साठे यांनी काढलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले की,  चारचाकी वाहनासाठी वर्षाला नऊ हजारांहून जास्त कर आकारला जाणार आहे. ही रक्कम एखाद्या सदनिकेच्या किंवा व्यापारी, वाणिज्य गाळ्याच्या वार्षिक मिळकतीपेक्षा जास्त आहे. पुणे, मुंबई महापालिकेच्या धर्तीवर हा कर आकारला जाईल, असे सांगण्यात आले. परंतू या शहरातील नागरीकांना भाजपाने निवडणूकीपुर्वी दिलेले एकही आश्वासन पुर्ण करता आले नाही. यात अनाधिकृत बांधकाम प्रश्न, शास्तीकर रद्द करणे, बंद जलवाहिनीतून चोविस तास मुबलक स्वच्छ पाणी पुरवठा करणे, रोजगारात वाढ करणे, शहरातील गुन्हेगारीवर, वाहतुकीवर नियंत्रण मिळविण्यासाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालय उभारणे, कचरा व्यवस्थापन करणे, नद्यांचे संवर्धन, महिला सक्षमीकरण करणे, ज्येष्ठांना सुविधा देणे, शहरातील क्रिडांगणे विकसित करणे, शहरात वायफाय सुविधा सुरु करणे, प्राधिकरणातील घरे फ्री होल्ड करणे, सुसज्ज भाजी मंडई उभारणे, झोपडपट्ट्यांचे पुर्नवसन व आर्थिक दुर्बल घटकांसाठी आरक्षित भुखंड विकसित करणे, चाकण पर्यंत मेट्रो सुरु करणे, शहरात सरकारी अभियांत्रिकी, वैद्यकीय महाविद्यालय सुरु करणे अशी शेकडो आश्वासने भाजपाने निवडणूकीपुर्वी शहरवासीयांना दिली होती.

जनतेला अच्छे दिनचे स्वप्न दाखविले. त्याला भुलून शहरातील मतदारांनी भाजपाला एकहाती सत्ता दिली. दिलेल्या आश्वासनांकडे सोयीस्कर दुर्लक्ष करुन उलट जनतेच्याच खिशातील पैसा लुटून भाजपाचे कार्यकर्ते पोसण्यासाठी पार्किंग पॉलीसीच्या गोंडस नावाखाली जनतेकडून जीझिया कर वसूल करण्याचे काम हे प्रशासन करीत आहेत. या धोरणास शहरातील नागरीक तीव्र विरोध करतील. हा ठराव प्रशासनाने रद्द करावा अन्यथा पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करेल. असा इशारा साठे यांनी दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button