breaking-newsआंतरराष्टीय

कोसळलेल्या MI 17 हेलिकॉप्टरचा ब्लॅक बॉक्स सापडेना

भारतीय हवाई दलाचे एमआय १७ हेलिकॉप्टर २७ फेब्रुवारी रोजी बडगामजवळ कोसळले होते. या अपघातात ६ जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. या हेलिकॉप्टरचा ब्लॅक बॉक्स गायब झाला असून भारतीय वायूसेनेकडून याचा शोध घेतला जात आहे. उड्डाणादरम्यानची सर्व माहिती या बॉक्समध्ये असते. त्यामुळे अपघाताचे कारण समजू शकते.

‘एएनआय’ने याप्रकरणी वृत्त दिले आहे. भारतीय वायूसेनेतील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टर कोसळल्यापासून ब्लॅक बॉक्स गायब आहे. आम्ही त्याचा शोध घेत आहोत. कदाचित हा बॉक्स स्थानिक लोकांकडे असेल. अपघात झाल्यानंतर स्थानिकांनी हेलिकॉप्टरचे काही अवशेष आपल्याबरोबर नेले होते, त्यामुळे अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ज्यावेळी पाकिस्तानी वायूसेनेच्या विमानांनी भारतात घुसण्याचा प्रयत्न केला होता. त्याचवेळी एमआय १७ हेलिकॉप्टरने २७ फेब्रुवारीला श्रीनगरहून त्याचवेळी उड्डाण केले होते. परंतु, भारताकडून त्वरीत प्रत्युत्तर दिल्यानंतर पाकिस्तानला अपयश आले होते.

अनेकवेळा विमान किंवा हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर त्याच्या ब्लॅक बॉक्सवरुन कोसळण्याचे कारण समजले आहे. ज्यावेळी हेलिकॉप्टर कोसळले त्यादिवशी ते आपल्या नियमित कामगिरीवर होते. हेलिकॉप्टरमध्ये ६ वायूसैनिक होते. हेलिकॉप्टर अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button