breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

औद्योगिक परिसरात पडतो महापालिकेच्या रहिवाशी भागाचा कचरा

फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांचा आंदोलनाचा इशारा

पिंपरी | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महापालिकेचा कचरा औद्योगिक परिसरात टाकला जात आहे. याला फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनने विरोध केला आहे. उद्योजकांनी आपला कचरा कुठे टाकायचा असा सवाल अध्यक्ष अभय भोर यांनी उपस्थित केला आहे. हा प्रकार न थांबल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.

प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे की, औद्योगिक परिसरात स्वच्छतेचा अभाव आहे. मूलभूत सुविधा देण्यास महानगरपालिका अकार्यक्षम आहे. अनेकदा अनेक भागात कचराकुंडीची मागणी करून सुद्धा ती पूर्ण केली जात नाही. कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोजचा साधा कचरा निर्माण होतो. परंतु आयुक्तांना विचारल्यास आयुक्तांचे उत्तर आमचे ते काम नाही, अशा प्रकारे असते. दुसरीकडे एमआयडीसी परिसरात ज्या ठिकाणी कचराकुंड्या आहेत, त्याठिकाणी महानगरपालिकेच्या घंटागाड्या रहिवाशी भागातील कचरा आणून त्या कचरा कुंड्यांमध्ये टाकत आहेत. त्यामुळे परिसरातील कचराकुंड्या फुल भरत आहेत. नाईलाने उद्योजकांना कचरा रस्त्यावर टाकावा लागतो.

वास्तविक महानगरपालिका परिसरातील जमा केलेला कचरा, कचरा डेपोमध्ये जायला पाहिजे. परंतु तिकडे न जाता एमआयडीसी परिसरात असणाऱ्या कचराकुंड्या मध्ये कचरा का टाकला जातो, असा सवाल उद्योजक उपस्थित करत आहेत. कचराकुंड्या या परिसरातील उद्योजकांना कचरा टाकण्यासाठी ठेवलेले असतात. पण त्याचा वापर होत नसेल तर त्या कुंड्या असून अडचण अन नसून खोळंबा असे झाले आहे. औद्योगिक परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ठीक दिसून येत आहेत. महानगरपालिकेच्या आरोग्य खात्याने त्याबाबत खुलासा द्यावा, अशी मागणी फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी केली. अन्यथा तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशारा त्यांनी प्रसिधीपत्रकाद्वारे दिला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button