Breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

अर्नाळा येथील समुद्रकिनारी ५ जण बुडाले, एकाचा मृतदेह हाती

अर्नाळा येथील कळंब बीच येथे होळी साजरा करण्यासाठी गेलेल्या ५ जणांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. ही घटना आज (गुरूवार) सांयकाळच्या सुमारास घडली. मृतांमध्ये दोन कुटुंबातील ५ जणांचा समावेश आहे. स्थानिकांनी वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांना यश आले नाही. घटनास्थळी पोलीस, अग्निशमन दलाचे जवान उपस्थित असून मृतदेहांचा शोध सुरू आहे. एक मृतदेह हाती लागला असून इतर ४ मृतदेहांचा शोध घेतला जात आहे. ऐन सणाच्या दिवशी ही दुर्घटना घडल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतांमध्ये ४ महिलांचा समावेश आहे.

मृत व्यक्तींची नावे पुढीलप्रमाणे:
निशा कमलेश मौर्य (वय ३६), प्रशांत कमलेश मौर्य (वय १७), प्रिया कमलेश मौर्य (वय १९, सर्व रा. ०७, २०२ गोकुल पार्क, मानव मंदिर स्वामी नारायण मंदिर, अंबाडी रोड, वसई पश्चिम), कांचन मुकेश गुप्ता (वय ३५), शितल दिनेश गुप्ता (वय ३२, रा. १/१, गोकुल पार्क, मानव मंदिर, अंबाडी रोड वसई पश्चिम)

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button